कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी सज्ज रहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:19 AM2021-05-26T04:19:57+5:302021-05-26T04:19:57+5:30

अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली ...

Be prepared for a possible third wave of corona! | कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी सज्ज रहा!

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका रोखण्यासाठी सज्ज रहा!

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये होणारा धोका रोखण्यासाठी जिल्ह्यातील बाल रोग तज्ज्ञ डॉक्टरांनी सज्ज राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी केले.

जिल्हा नियोजन भवनात बाल रोग तज्ज्ञ टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. सिरसाम, उपअधीक्षक डॉ. घोरपडे, आदी उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासकीय तसेच खासगी डॉक्टरांनी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले. शहरातील तसेच जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांनी बालकांमध्ये कोविड लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी व नियमानुसार उपचार पद्धती राबवावी, शक्यतो बालकांना शासकीय रुग्णालयात संदर्भित करावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करा !

जिल्हा व तालुकास्तरावर बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करून त्याठिकाणी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात. बाधित असलेल्या बालकांच्या पालकांना उपचाराविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करावे. तसेच आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांद्वारे बाधित बालकांचे निरीक्षण करण्यात यावे, याकरिता त्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड सज्ज ठेवा!

अतिजोखमीच्या बालकांसाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड सज्ज ठेवावे. याकरिता आवश्यक साधनसामग्री व औषधी उपलब्धतेबाबत नियोजन करावे. कोविडसंदर्भात देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिले.

....................फोटो..............................

Web Title: Be prepared for a possible third wave of corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.