बीएड अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:22 AM2021-08-27T04:22:55+5:302021-08-27T04:22:55+5:30

राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्याचे नियोजन केले आहे. या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची २५ ऑगस्ट होती. फक्त ...

BEd final year results announced | बीएड अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर

बीएड अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर

Next

राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्याचे नियोजन केले आहे. या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची शेवटची २५ ऑगस्ट होती. फक्त डीएड व बीएड पास विद्यार्थीच परीक्षेसाठी पात्र असतील. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ बीएडची परीक्षा १४ ऑगस्टपर्यंत बाजूने घेण्यात आली होती. २२ ऑगस्टपूर्वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यास विद्यार्थी टीईटी परीक्षा देऊ शकतील, अन्यथा ते परीक्षेपासून वंचित राहतील, त्यामुळे विद्यार्थी नेते फरहान अमीन यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीने बीएडचा निकाल जाहीर केला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ची तारीख ५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

Web Title: BEd final year results announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.