वाडेगाव येथे शेतकऱ्यांनी घेतले मधुमक्षिका पालन प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:34 AM2020-12-16T04:34:09+5:302020-12-16T04:34:09+5:30
या प्रशिक्षणामध्ये ५० शेतकरी महिला व पुरुष यांनी भाग घेतला असून, तांत्रिक अधिकारी बिलबिले, कृषी माहिती-तंत्रज्ञान केंद्र ...
या प्रशिक्षणामध्ये ५० शेतकरी महिला व पुरुष यांनी भाग घेतला असून, तांत्रिक अधिकारी बिलबिले, कृषी माहिती-तंत्रज्ञान केंद्र अध्यक्ष डॉ. केशव सरप, तांत्रिक सहायक दत्तात्रय टाले यांनी मार्गदर्शन केले. मधुमक्षिका पालन शेतीपूरक व्यवसाय असून, मधमाशी पेट्या मोठ्या प्रमाणावर प्राप्तीसाठी व त्याची विक्री करण्यासाठी मधमाशा पाळल्या जातात. मधमाशी पालन हा शेतीपूरक व्यवसाय असून, फुलातील रसाला/परागांना मधात बदलते व त्यास आपल्या पोळ्यात जमा करते. जंगलातून व इतर ठिकाणाहून मध गोळा करण्याची फार प्राचीन परंपरा आहे. बाजारात मधाच्या मागणीस वाढता प्रतिसाद बघता मधमाशीपालन हा एक फायदेशीर व आर्थिक व शेतीस उत्पन्न प्राप्ती देणारा व्यवसाय आहे. त्यातून निघणारे नैसर्गिक मेनापासूनही आर्थिक लाभ होते. असे मार्गदर्शन त्यांनी केले. या प्रशिक्षणामध्ये सहभागी शेतकरी नितेश लोखंडे ,अर्चनाताई थोरात, तेजराव लवाळे, रामेश्वर सोनटक्के, अश्विनी ताकवाले, स्वाती वाढोकार, बहुसंख्य शेतकऱ्यांनी प्रशिक्षणामध्ये भाग घेतला आहे.
फोटो: