पालखीतील भाविकांवर मधमाशांचा हल्ला

By admin | Published: March 13, 2016 01:48 AM2016-03-13T01:48:36+5:302016-03-13T02:29:33+5:30

मंगरूळपीर तालुक्यातील घटना; ९ वारक-यांवर मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात उपचार.

Bees attack on pilgrims | पालखीतील भाविकांवर मधमाशांचा हल्ला

पालखीतील भाविकांवर मधमाशांचा हल्ला

Next

मंगरुळपीर (वाशिम): तालुक्यातील चेहेल येथे सकाळी ९ वाजताच्या दरम्यान मंगलवाडी ता.रिसोड येथील पायदळ पालखी धामणगाव येथे जात असता वाटेतील चेहेल येथे वारकर्‍यांना प्रसाद वाटप करीत असताना अचानकपणे ६0 वारकर्‍यांवर मधमाशांनी हल्ला करून चावा घेतला. यात वारकरी जखमी झाल्याची माहिती आहे. वारकर्‍यांना प्रसादाचे वितरण चालू असताना मधमाशांनी वारकर्‍यांना चावा घेऊन जखमी केले. ही बाब लक्षात येताच गावकर्‍यांनी सतर्कता बाळगून रुग्णवाहिकेला फोन केला. तत्काळ १0८ रुग्णवाहिका आल्यानंतर यातील डॉक्टर चमूने वारकर्‍यांवर उपचार केले. तर यातील ९ वारकर्‍यांवर मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून, अनेक जणांना शरीरावर जखमा झाल्या आहेत. रुग्णवाहिकेसोबत डॉ. राजेश चौधरी, डॉ. बोरकर, डॉ. हितेश सुर्वे, डॉ. नितेश इंगोले व इतर कर्मचार्‍यांनी पुढकार घेऊन सहकार्य केले. दुपारी १ वाजता पालखी कुपटा मार्गे धामणगाव देवकडे रवाना झाली. गतवर्षी पिंपळखुटा येथे मधमाशांनी पालखीवर हल्ला केला होता.

Web Title: Bees attack on pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.