मूग, उडिद खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:58 PM2017-10-03T12:58:22+5:302017-10-03T12:58:22+5:30
अकोला: शासनाकडून हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणीला मंगळवारी चार केंद्रावर सुरूवात झाली. पहिल्या दिवशी चारही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूरळक प्रमाणात शेतकºयांनी उपस्थिती दाखवली.
अकोला: शासनाकडून हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी करण्यासाठी आॅनलाइन नोंदणीला मंगळवारी चार केंद्रावर सुरूवात झाली. पहिल्या दिवशी चारही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूरळक प्रमाणात शेतकºयांनी उपस्थिती दाखवली.
जिल्ह्यात अल्प पावसाचा तर इतरत्र अति पावसाचा फटका बसल्याने मूग, उडिदाचे पीक राज्यभरात नसल्यासारखेच आहे. त्यातही जे हातात आले, त्याची खरेदी मातीमोल भावाने करत व्यापाºयांनी शेतकºयांना नागवणे सुरू केले. त्यावर उपाय म्हणून शासनाने हमीभावाने मूग, उडीद खरेदी ३ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचे पणन विभागाला सांगितले. त्यानुसार तालुका खरेदी-विक्री संस्थेकडून कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्रात खरेदी होणार आहे.
ही खरेदी सुरू होण्यापूर्वी शेतकºयांची नोंदणी केली जाणार आहे. या खरेदीसाठी महसूल मंडळ स्तरावरील पीक कापणी प्रयोगांच्या उत्पादकतेची आकडेवारी प्रमाण ठरवण्यात आली. ३ आॅक्टोबरपासून खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू झाली. त्यानुसार शेतकºयांना मूग, उडीद विक्री करण्यासाठी बाजार समितीच्या केंद्रात आॅनलाइन माहिती द्यावी लागत आहे. त्यामध्ये जमिनीचा सात-बारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेतले जाईल. सात-बारामध्ये असलेली जमीन आणि त्यामध्ये असलेला पीक पेरा या आधारे शेतकºयांच्या उत्पादनाची मर्यादा ठरणार आहे. तेवढ्या क्विंटलची खरेदी केंद्रात केली जाईल. जिल्ह्यात मूग, उडीद खरेदीसाठी पणन महासंघाने अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या चार केंद्रांवर सोय केली आहे. त्या ठिकाणी खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नोंदणी केलेल्या शेतकºयांचा एफएक्यू दर्जाच्या मूग, उडीद खरेदी केली जाईल.