धामणा बॅरेजमध्ये पाणी साठविण्यास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:23 PM2019-09-30T12:23:14+5:302019-09-30T12:23:20+5:30
नेर धामणा बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा हा पूर्ण संचय पातळीला २४५ मिटरपर्यंत केला जाणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला तालुक्यातील नेर धामना बॅरेजमध्ये घटस्थापनेच्या दिवशी पाणी साठा करण्यास सुरूवात करण्यात आली असून दसऱ्यापर्यंत पूर्ण पाणीसाठ्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यासाठी सर्व द्वारांचे परीचलन नियोजनाप्रमाणे होत असल्याची खात्री पाटबंधारे विभागाकडून करून घेतल्या जात आहे.
नेर धामणा बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा हा पूर्ण संचय पातळीला २४५ मिटरपर्यंत केला जाणार आहे. त्या पातळीनुसार होणाºया बुडीत क्षेत्राची पाहणी ड्रोनद्वारे केली जाणार आहे. पाणीसाठा करण्यासाठी जलसंपदा विभाग सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता
राजेंद्र जलतारे यांच्या मार्गदर्शनात पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकामासाठी प्रयत्न करीत आहेत. हा प्रकल्प बळीराजा जलसंजिवनी कार्यक्रमामध्ये अंतर्भुत आहे. पाणीसाठा करण्यासाठी अभियंतांना तब्बल १० वर्षे मेहनत घ्यावी लागली. हे विशेष काटीपाटी बॅरेजला या प्रकल्पा सोबतच प्रशासकीय मान्यता मिळाली होती. काटीपाटीला चालना मिळू शकली नाही.