महाशिवरात्रीच्या पर्वावर सात वर्षांपासून बेलवृक्षाची लागवड

By admin | Published: February 24, 2017 04:08 PM2017-02-24T16:08:47+5:302017-02-24T16:08:47+5:30

एसएमसी इंग्लिश स्कूल ही शाळा विविध उत्सवादरम्यान वृक्षांचे रोपण करून आगळावेगळा आदर्श समाजापुढे ठेवत आहे.

Bellavrikra plantation since seven years since Mahashivratri | महाशिवरात्रीच्या पर्वावर सात वर्षांपासून बेलवृक्षाची लागवड

महाशिवरात्रीच्या पर्वावर सात वर्षांपासून बेलवृक्षाची लागवड

Next

ऑनलाइन लोकमत
पर्यावरण वृद्धी: वाशिमच्या एसएमसी शाळेचा उपक्रम 
वाशिम, दि. 24 : एकिकडे इंधन आणि इतर कामांसाठी सर्रास ओल्या वृक्षांची कत्तल होत असताना येथील एसएमसी इंग्लिश स्कूल ही शाळा विविध उत्सवादरम्यान वृक्षांचे रोपण करून आगळावेगळा आदर्श समाजापुढे ठेवत आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर मागील सात वर्षांपासून ही शाळा बेलवृक्षाची लागवड करीत असून, यंदा हा उपक्रम वाशिम येथील पद्मतीर्थ परिसरात पार पाडण्यात आला. 
एकिकडे इंधन आणि इतर कामांसाठी सर्रास ओल्या वृक्षांची कत्तल होत असताना येथील एसएमसी इंग्लिश स्कूल ही शाळा पर्यावरण रक्षणासाठी विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविते. त्यामध्ये वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, पर्यावरणपुरक होळीबाबत जनजागृती आदि उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गतच शाळेच्यावतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर २०१० पासून बेलवृक्षाची लागवड करण्याचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. महाशिवरात्रीच्या औचित्यावर बेलवृक्षाची लागवड करण्यामागे पर्यावरण रक्षण हा हेतूू आहेच. त्याशिवाय दिवसेंदिवस सततच्या वापरामुळे नष्ट होत चाललेल्या या वृक्ष प्रजातीचे जतन करून महादेवाची अभिनव पद्धतीने आराधना करणे हासुद्धा त्यामागचा दृष्टीकोण आहे. एसएमसी शाळेच्या प्राचार्य मिना उबगडे, तसेच राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकूंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात हरीत सेना व इको क्लबच्यावतीने हा उपक्रम यंदाही राबविण्यात आला.

Web Title: Bellavrikra plantation since seven years since Mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.