अकोला जिल्ह्यात लाभार्थ्यांना कोविशिल्डचा दुसरा डोस मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 10:17 AM2021-04-12T10:17:39+5:302021-04-12T10:20:23+5:30
Corona Vaccine : लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस मिळणे अशक्य झाले आहे.
Next
ref='https://www.lokmat.com/topics/akola/'>अकोला : जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ कोव्हॅक्सिनचा साठा शिल्लक असून, हा साठाही हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे, तर दुसरीकडे कोविशिल्ड लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस मिळणे अशक्य झाले आहे. लसींअभावी जिल्ह्यातील १३८ केंद्र बंद झाले असून, अनेकांना लस न मिळाल्याने लसीकरण केंद्रावरून परतावे लागल्याचे चित्र रविवारी पाहावयास मिळाले. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्यात कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातल लसीकरणासाठी १५३ केंद्र सुरू करण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्याला मागणीएवढा लसीचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे कोविशिल्डचा उपलब्ध साठा संपला असून, कोव्हॅक्सिनचा साठाही हळूहळू संपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरणाची सुरुवात कोविशिल्ड लसीने झाली होती. त्यामुळे बहुतांश लाभार्थ्यांना लसींचा दुसरा डाेस घ्यावा लागणार आहे, मात्र कोविशिल्ड लस उपलब्धच नसल्याने अशा लाभार्थ्यांना दुसरा डोस मिळणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या डोससाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. रविवारी केवळ १५ केंद्रांवर कोविड लसीकरण झाले असून, केवळ १३०० लाभार्थ्यांना लस मिळाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दाेन दिवसांत लसीकरण ठप्प पडण्याची शक्यता जिल्ह्यात मोठ्या उत्साहात सुरू झालेले कोविड लसीकरण मोहीम केव्हाही ठप्प पडण्याची शक्यता आहे. उपलब्ध लसीचा साठा हळूहळू संपण्याच्या मार्गावर असून, दररोज काही भागातील लसीकरण केंद्र बंद पडत आहेत. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील लसीकरण मोहीम पूर्णत: बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.