पीएम आवासचे लाभार्थी प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:19 AM2021-05-13T04:19:01+5:302021-05-13T04:19:01+5:30
खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता अकाेला : पश्चिम झाेनलगत शिवाजी नगरस्थित भाजी बाजार ते श्रीवास्तव चाैकापर्यंत भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी खाेदकाम ...
खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता
अकाेला : पश्चिम झाेनलगत शिवाजी नगरस्थित भाजी बाजार ते श्रीवास्तव चाैकापर्यंत भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामासाठी खाेदकाम करण्यात आले. यावेळी श्रीवास्तव चाैकाच्या बाजूला खाेदण्यात आलेला खड्डा जैसे थे असल्यामुळे दुचाकीचालकांच्या जिवाला धाेका निर्माण झाला आहे.
सफाईच्या कामांकडे दुर्लक्ष
अकाेला : शहराच्या कानाकाेपऱ्यात हाेणाऱ्या साफसफाईच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने स्वच्छता व आराेग्य विभागात आराेग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांना काेणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी घाण साचल्याचे दिसत आहे.
रस्ता उखडला
अकाेला : खडकी परिसरातील संताेष नगरमधील साने गुरुजी शाळेकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. हा रस्ता तयार करण्याची मागणी स्थानिकांकडून हाेत आहे. या परिसरात नियमित साफसफाई हाेत नसल्यामुळे नाल्यांमधील घाण सांडपाणी रस्त्यांवर साचले आहे.
लसीकरणासाठी नियमांकडे पाठ
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत असून, काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना वारंवार केली जात असतानादेखील लसीकरणासाठी हाेणाऱ्या गर्दीमध्ये काेराेना नियमांकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
चाचणीसाठी पुढाकार घ्या!
अकाेला : वातावरणातील बदलामुळे अकाेलेकरांना सर्दी, खाेकला, अंगदुखी, आदी संसर्गजन्य आजारांनी बेजार करून साेडले आहे. शहरात विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाची लक्षणे व साध्या सर्दीच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.