वर्षभरापूर्वी मंजूर झालेल्या शेळया लाभार्थ्याना मिळाल्याच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:19 AM2021-03-25T04:19:12+5:302021-03-25T04:19:12+5:30
बोरगाव वैराळे येथील माणिकराव वानखडे यांचा शेळी, मेंढया गट सन २०१९-२० मध्ये मंजूर करण्यात आले होते. तसे मंजूरीचे पत्र ...
बोरगाव वैराळे येथील माणिकराव वानखडे यांचा शेळी, मेंढया गट सन २०१९-२० मध्ये मंजूर करण्यात आले होते. तसे मंजूरीचे पत्र देखील संबंधित लाभार्थीला देण्यात आले होते. परंतु अद्याप प्रत्यक्ष लाभ त्या लाभार्थ्याच्या पदरात पडला नसल्यामुळे या लाभार्थ्यांसाठी ही योजना केवळ दिवास्वप्न ठरली आहे. तसेच शासन अनुसूचीत जातीच्या लोकांसाठी ही योजना केवळ कागदोपत्रीच आहे का असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. शासनाने अनुसूचित जातीच्या लाभार्थींसाठी सुरू केलेल्या योजनेचा लाभ देण्याची योजना ही कागदोपत्री न ठेवता, याचा लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ देण्याची मागणी होत आहे.
बाळापूर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जातीचे शेळी-मेंढ्यांचे गट मंजूर आहेत. परंतु अहिल्याबाई होळकर संस्था पोहरादेवी कडून खरेदी करायचे आहेत. तेथील खरेदी बंद असल्याने लाभार्थीला लाभ देता आला नाही.
-धुळे, पशुसंवर्धन अधिकारी बाळापूर