२१ हजार ग्राहकांनी घेतला ‘गो-ग्रीन' वीज देयक सवलतीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 04:34 PM2019-01-11T16:34:02+5:302019-01-11T16:34:08+5:30
अकोला : वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एस.एम.एस.चा पर्याय स्विकारणा-या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती. गत एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनीया सवलतीचा लाभ घेतला आहे.
अकोला : वीजबील भरण्यासाठी छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एस.एम.एस.चा पर्याय स्विकारणा-या ग्राहकांना प्रती वीजबील १० रुपये सवलत महावितरणने १ डिसेंबर २०१८ ला जाहीर केली होती. गत एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजार ग्राहकांनीया सवलतीचा लाभ घेतला आहे. यामध्ये अकोला परिमंडळतील ९०८ ग्राहकांचा समावेश आहे. अन्य ग्राहकांनीही या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबील आॅनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल अॅप व संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. अशा सर्व ग्राहकांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जात आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन करावी, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.
‘गो ग्रीन’ पर्यावरणपूरक
गो-ग्रीनचा पर्याय निवडणा-या ग्राहकांना तातडीने वीजबील मिळत असून, संदभार्साठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे.