वंचित शिधापत्रिकाधारकांना मिळणार धान्याचा लाभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 02:30 PM2019-07-14T14:30:19+5:302019-07-14T14:30:25+5:30
धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लवकरच धान्याचा लाभ देण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यात धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लवकरच धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पुरवठा विभागामार्फत १५ जुलैपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत ज्या शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ मिळत नाही, अशा सर्व पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थींना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्याचे वितरण सुरू करण्यासाठी १५ जुलै ते १५ आॅगस्ट या कालावधीत विशेष मोहीम राबवून धान्याच्या लाभापासून वंचित शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश पुरवठा मंत्र्यांनी २८ जून रोजी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे दिले. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात धान्याच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थींना लवकरच धान्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
विशेष मोहिमेत प्रलंबित अर्जांचा होणार निपटारा!
पुरवठा विभागामार्फत १५ जुलै ते १५ आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणाºया विशेष मोहिमेत धान्याचा लाभ सुरू करण्यासंदर्भात शिधापत्रिकाधारक लाभार्थींनी केलेल्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यात येणार आहे. प्रलंबित अर्जांचा निपटारा केल्यानंतर पात्र लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
जिल्हा पुरवठा विभागात स्थापन होणार विशेष कक्ष!
धान्याच्या लाभापासून वंचित लाभार्थींना धान्याचा लाभ देण्यासाठी राबविण्यात येणाºया विशेष मोहिमेत राज्यातील जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यालयात विशेष संगणक कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या विशेष कक्षामार्फत शिधापत्रिकाधारक लाभार्थींचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
धान्याच्या लाभापासून वंचित शिधापत्रिकाधारक लाभार्थींना धान्याचा लाभ देण्यासाठी १५ जुलै ते १५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात येत आहे. या कक्षात तात्पुरत्या स्वरूपात ३८ संगणक आॅपरेटर्सची नियुक्ती करण्यात येत असून, शिधापत्रिकाधारक लाभार्थींच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यात येणार आहे.
-बी. यू. काळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.