गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी बेस्ट फ्रॉम रेस्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:55 PM2019-05-05T12:55:54+5:302019-05-05T12:56:02+5:30

भारतीय जैन संघटना महिला शाखा अकोला व वुई कॅन फाउंडेशनच्यावतीने गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी बेस्ट फ्रॉम रेस्ट उपक्रम सुरू केला आहे.

Best From Rest for the poor, needy students! | गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी बेस्ट फ्रॉम रेस्ट!

गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी बेस्ट फ्रॉम रेस्ट!

Next

- नितीन गव्हाळे

अकोला: समाजात वावरताना, अनेक गरीब विद्यार्थी दिसून येतात. परिस्थितीमुळे त्यांना अनेक जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित राहावे लागते. मनात आणूनही त्यांना शालेय साहित्य विकत घेता येत नाही. अशा मुलांना मदतीचा हात द्यावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे. या उदात्त हेतूने भारतीय जैन संघटना महिला शाखा अकोला व वुई कॅन फाउंडेशनच्यावतीने गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी बेस्ट फ्रॉम रेस्ट उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत लोकांकडे असलेल्या जीवनावश्यक वस्तू गोळा करून या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
प्रत्येकाची एक गरज असते आणि ही गरज भागविण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते आपल्या स्वप्नातील अनेक गोष्टी, वस्तू सहजरीत्या खरेदी करू शकतात; परंतु समाजात अनेक विद्यार्थी, पालक असे आहेत की, इच्छा असूनही त्यांना मुलांना चांगले कपडे, पुस्तके, दप्तर, शालेय बूट, चप्पल, सायकलसारख्या गरज असलेल्या वस्तू घेऊन देऊ शकत नाहीत. कारण हलाखीची, गरिबीची परिस्थिती त्यांच्या नशिबी आलेली असते. आपल्याला ज्या अनेक वस्तू जुन्या वाटतात. एकदा वापरल्यानंतर आपण ती वस्तू पुन्हा वापरतसुद्धा नाही. अशा वस्तू बºयाच लोकांना स्वप्नातसुद्धा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या स्वप्नातील वस्तू त्यांना मिळाव्यात. आपल्याजवळ जे रेस्ट आहे, ते बेस्ट बनविणे आपल्या सर्वांच्या हातात आहे. त्यासाठीच भारतीय जैन संघटना महिला शाखा अकोला व वुई कॅन फाउंडेशनच्यावतीने बेस्ट फ्रॉम रेस्ट उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात अकोलेकरांनी योगदान देऊन गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू देऊन त्यांच्या चेहºयावर हास्य फुलवावे. (प्रतिनिधी)
 
कोणत्या स्वरूपात करावी मदत!
अनेकदा आपण नवी वस्तू घेतो. काही दिवस वापरतो आणि टाकून देतो. अशा स्कूल बॅग, शूज, चप्पल, स्कूल बॅग, टिफीन बॉक्स, वॉटर बॉटल, खेळणी, सायकल आपण देऊन गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात हास्य निर्माण करू शकतो आणि त्यांना पुढे जायला मदतसुद्धा. दानशूर व्यक्तींनी या वस्तू १ जूनपर्यंत द्याव्यात. त्यासाठी ८0८७६६0१४१ क्रमांकावर संपर्क साधावा.

१५ सायकली झाल्या गोळा
भारतीय जैन संघटना, वुई कॅन फाउंडेशनच्या आवाहनानुसार काही दानशूर व्यक्तींनी गरीब विद्यार्थ्यांसाठी १५ जुन्या सायकली भेट दिल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यातील चार सायकली या नागपुरातील दानशूरांनी दिल्या आहेत.

 

Web Title: Best From Rest for the poor, needy students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.