देशमुख, खांदेल, निकामे यांना बेस्ट टीचर ॲवॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:16 AM2021-04-26T04:16:04+5:302021-04-26T04:16:04+5:30
लीप ऑफ वर्ल्ड या शैक्षणिक प्रवासात कार्य करणाऱ्या संस्थेने, कोरोना कालावधीत शाळा बंद असल्याने ‘शाळा बंद-शिक्षण सुरू’ या ...
लीप ऑफ वर्ल्ड या शैक्षणिक प्रवासात कार्य करणाऱ्या संस्थेने, कोरोना कालावधीत शाळा बंद असल्याने ‘शाळा बंद-शिक्षण सुरू’ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी, इंग्रजी विषयाचा लिखाणाचा सराव व्हावा व त्यांचे विषयाचे ज्ञान समृद्ध व्हावे यासाठी वर्षभर शिक्षक व पालकांच्या मार्फत विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन सराव दिला. शिक्षकांनी पालकांच्या सपर्कात राहून संस्थेच्या द्वारे विषयाची तयारी करू घेतली.
लीप संस्थेच्या निरीक्षणात अकोला जिल्हा परिषद अंतर्गत शाळेमधील शिक्षक, देशमुख, खांदेल व निकामे यांच्या वर्गातील विद्यार्थी टक्केवारीने अधिक असल्याने सदर शिक्षकांना बेस्ट टीचर ॲवाॅर्ड घोषित केला, तर जि.प. शाळा रेल शाळेतील शिक्षक अभिषेक भांडे, शिवशंकर मुंकिदे, गजानन साबळे, सुनील झगडे, विठ्ठल वानखडे, वंदना आपोतीकर, सविता साखरकर यांनी सर्वाधिक विद्यार्था सहभागी केल्याबद्दल बेस्ट टीचरसह बेस्ट स्कूल हे दोन्ही ॲवॉर्ड रेल शाळेने पटकाविले.
...........‘........
लस घेण्यापूर्वी करा रक्तदान
अकोला : जेसीआय अकोला यंगिस्तानच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशन व अकोला ब्लड बँक यांच्या सहकार्याने महारक्तदान शिबिराचे आयोजन आयएमए हॉल येथे केले आहे. २७ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात तरुणांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जेसीआय अकोला यंगिस्तानचे अध्यक्ष हिमांशू खंडेलवाल यांनी सर्वांना केले आहे. कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. लसीकरण सुरू होण्यापूर्वी १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुणांना रक्तदान करण्याची गरज आहे. लस घेतल्यानंतर कमीत कमी ३० दिवस तुम्ही रक्तदान करण्यास पात्र राहणार नाही. त्यामुळे तीन दिवसांच्या शिबिरात पहिल्या दिवशी ३५ तरुणांनी रक्तदान केले, त्यामध्ये ३ युवतींचाही समावेश आहे.
शिबिरासाठी रोहन बियाणी व मिहीर धाबलिया यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. अक्षय धाबलिया, श्रेयस भाला, सौरभ सारडा, सर्वेश तावरी, मनीष चांदनानी, जसमीत ओबेरॉय, वरुण अग्रवाल, अनुज गोयल, किशन कोठारी, प्रतीक बाहेती, शुभम भाला, रोटरेक्ट क्लब अकोलामधून अपूर्व पतिरा, विक्रम केजडीवाल, कौशल धाबलिया व शिवम रांदड, रोटरी क्लब ऑफ अकोला मिडटाउनमधून प्रकाश सारडा आणि संदेश रांदड, एयू बँक येथून श्रीकांत जावरे आणि डॉ. के.के. अग्रवाल व अकोला ब्लड बँकची टीम यांनी आपली उपस्थिती दर्शावली.
........................