अकोलेकरांनो सावधान...! जिल्ह्यात डेंग्यूची एन्ट्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:55+5:302021-08-22T04:22:55+5:30
ही घ्या काळजी आपल्या घराभोवती अथवा परिसरात पाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे किंवा बुजवणे, घराच्या खिडक्यांना ...
ही घ्या काळजी
आपल्या घराभोवती अथवा परिसरात पाणी साचू न देणे, साचलेली डबकी वाहती करणे किंवा बुजवणे, घराच्या खिडक्यांना डासविरोधी जाळ्या बसविणे, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, घरगुती पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून घासून, पुसून, स्वच्छ करून कोरडा दिवस पाळणे, टायर, फुटके कॅन, डबे यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साठणार नाही याची काळजी घेणे. झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, संडासच्या व्हेंट पाइपला जाळी बसविणे, कायमस्वरूपी डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडणे. तसेच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे.
मलेरियाचे बहुतांश रुग्ण आले जिल्ह्याबाहेरून
जिल्ह्याची वाटचाल मलेरियामुक्तीच्या दिशेने असताना जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांमध्ये मलेरियाचे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मलेरिया विभागामार्फत ग्रामीण भागात विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये त्यांचे क्रिनिंग करण्यात आले. त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात डेंग्यूचे दोन, तर मलेरियाचे ३० रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू, मलेरियापासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.
- डॉ. आदित्य महानकर, जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला