फुकट्या प्रवाशांनो सावधान; बसेसची दररोज तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:20 AM2021-09-27T04:20:17+5:302021-09-27T04:20:17+5:30
एकूण आगार - ५ एकूण पथके - ४ तपासणी अधिकारी - ८ प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपये दंड ...
एकूण आगार - ५
एकूण पथके - ४
तपासणी अधिकारी - ८
प्रवास भाड्याच्या दुप्पट किंवा १०० रुपये दंड
मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. सध्या महामंडळाच्या पथकांकडून बसेसची तपासणी सुरू आहे.
यामध्ये जिल्ह्यातील बसेसची तपासणी करून विनातिकीट प्रवाशांना दंड करण्याची मोहीम सुरू झालेली आहे. यामध्ये अनेकजण विनातिकीट आढळतात.
विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम किंवा १०० रुपये यापैकी जी रक्कम अधिक असेल, ती दंड म्हणून वसूल करण्यात येत आहे.
कुठेही, केव्हाही होऊ शकते तपासणी
जिल्ह्यात कुठेही आणि केव्हाही बसेसची तपासणी होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी एसटी बसने प्रवास करताना आपले तिकीट प्रवास होईपर्यंत जपून ठेवणे आवश्यक झाले आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम ६ ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
दंडाचे प्रमाण कळणार मोहिमेच्या अंती
एसटी महामंडळाने फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. एसटी महामंडळाच्या पथकाकडून दररोज बसेसची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विनातिकीट करताना आढळलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल केला जात असला तरी अकोला जिल्ह्यात नेमका किती प्रवाशांकडून किती दंड वसूल झाला, त्याचे प्रमाण मोहीम संपल्यानंतरच कळू शकणार आहे.