अकोलेकरांनो स्क्रब टायफस पासून राहा सावध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:23 AM2021-09-14T04:23:18+5:302021-09-14T04:23:18+5:30
२०१८ मध्ये विदर्भात घातला होता धुमाकूळ तीन वर्षांपूर्वी विदर्भात स्क्रब टायफसच्या रुग्णांची लक्षणीय संख्या आढळून आली होती. गवत किंवा ...
२०१८ मध्ये विदर्भात घातला होता धुमाकूळ
तीन वर्षांपूर्वी विदर्भात स्क्रब टायफसच्या रुग्णांची लक्षणीय संख्या आढळून आली होती. गवत किंवा झुडुपात आढळणारे ट्रॉम्बिक्युलीड माइटचे लारव्हे म्हणजेच पिसवा, चिगर किंवा सूक्ष्म कीटक चावल्यामुळे ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ नावाचे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात व स्क्रब टायफसची लागण होते.
ही आहेत सामान्य लक्षणे
सूक्ष्म कीटक चावल्यानंतर सुमारे पाच ते वीस दिवसात या आजाराची लक्षणे दिसतात.
सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, उलटी आदी लक्षणे दिसतात.
त्यामुळे अनेक रुग्णांमध्ये मलेरिया किंवा डेंग्यूची शक्यता वर्तवली जाते.
चिगर ज्या ठिकाणी चावतो तेथे एक व्रण दिसतो.
डीडीटी पावडरची फवारणी आवश्यक
पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यात अनेक भागात गवत आणि झुडूपं मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे विविध आजाराला कारणीभूत असलेल्या किटकांचाही धोका वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी गवत आणि झुडुपांवर डीडीटी पावडरची फवारणी करण्याची गरज आहे.