बीजी-२ कापूस बियाणे उपलब्ध करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:29 AM2020-04-21T11:29:53+5:302020-04-21T11:30:19+5:30

नांदेड-४४ बीजी-२ कपाशी पाकिटासह पीकेव्ही-२ कापसाचे ८० हजार पाकीट बाजारात उपलब्ध केले जाणार आहेत.

BG-2 to make cotton seeds available! | बीजी-२ कापूस बियाणे उपलब्ध करणार!

बीजी-२ कापूस बियाणे उपलब्ध करणार!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र राज्य (महाबीज) बियाणे महामंडळाने बाजारात बियाणे पुरवठा सुरू केला असून, यावर्षी नांदेड-४४ बीजी-२ कपाशी पाकिटासह पीकेव्ही-२ कापसाचे ८० हजार पाकीट बाजारात उपलब्ध केले जाणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात दुसऱ्या टप्प्यातील टाळेबंदी १५ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.२३ मार्चच्या मध्यरात्रीपासून पहिली टाळेबंदी लागू केली होती. यामध्ये राज्य शासनाने कृषीशी निगडित सर्व व्यवहार, वाहतुकीला परवानगी दिली होती. तरीही अनेक विषयासंदर्भात शेतकरी, कृषी संदर्भात संभ्रम असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्यास अडचणी आल्या आहेत. आता खरीप हंगाम जवळ येऊन ठेपल्याने दुसºया टप्प्यातील टाळेबंदीत शेतकरी, कृषी विभागाला पूर्ण सूट देण्यात आली आहे. याच अनुषंगाने बियाणे कंपन्या आणि महाबीजने बाजारात आवश्यक बियाणे पुरवठ्याची तयारी केली असून, प्रत्यक्षात पुरवठा सुरू केला आहे. ४.२५ लाख सोयाबीन बियाणे नियोजन महाबीजने केले आहे. त्यातील ९० टक्के बियाणे उपलब्ध झाले आहे. या बियाण्यांचा पुरवठा बाजारात सुरू करण्यात आला आहे. मूग, उडिदाची पेरणी दरवर्षी अनिश्चित असते. पाऊस वेळेवर जून महिन्यात पडला तरच या पिकाची पेरणी केली जाते; परंतु अलीकडच्या काही वर्षात ही दोन्ही पिके शेतकºयांना साथ देत नसल्याचे चित्र आहे. म्हणून शेतकरी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाचे नियोजन करतात. हे नियोजन समोर ठेवून महाबीजने यावर्षीही नांदेड-४४ बीजी-२ कापसाचे ६० हजार पाकीट बाजारात आणण्याचा निर्णय अगोदरच घेतला आहे. तसेच पीकेव्ही-२ बीजी कपाशीचे २० हजार पाकीट बाजारात उपलब्ध करण्यात येत आहेत. पीकेव्ही-२ चे उत्पादन सारखेच गतवर्षी शेतकºयांनी पीकेव्ही बीजी-२ कापसाचे बियाणे पेरणी केली होती; परंतु कापसाचे बोंड छोटे असल्याचे सांगण्यात येत होते; परंतु इतर कापूस जातीपेक्षा पीकेव्ही-२ ला बोंड जास्त लागतात आणि लागवड व इतर कीटकनाशके आदीचा खर्च कमी आहे. त्यामुळे ही मागणी आहे.


बाजारात बियाणे पाठविण्यास सुरुवात करण्यात आली असून, नांदेड-४४ साठ हजार आणि पीकेव्ही-२ बीजी-२ वीस हजार पाकीट उपलब्ध केली जाणार आहेत.
- अजय कुचे, महाव्यवस्थापक, (विपणन), महाबीज, अकोला.

Web Title: BG-2 to make cotton seeds available!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.