मूर्तिजापूर बाजार समिती सभापतीपदी भैयासाहेब तिडके
By admin | Published: October 16, 2015 02:03 AM2015-10-16T02:03:18+5:302015-10-16T02:03:18+5:30
उपसभापतीपदी गणेशराव महल्ले.
मूर्तिजापूर (जि. अकोला) : मूर्तिजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक १५ ऑक्टोबर रोजी पार पडली. या निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत अँड. भैयासाहेब तिडके हे सभापती म्हणून विजयी झाले, तर उपसभापती पदाची माळ गणेशराव महल्ले यांच्या गळ्यात पडली. मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार गटाने १३ जागा जिंकल्या, तर शेतकरी विकास आघाडीला ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. यानंतर गुरुवारी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत सहकार गटाकडून अँड. भैयासाहेब तिडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शेतकरी विकास आघाडीकडून रामचंद्र खंडारे यांनी उमेदवारी दाखल केली. तिडके यांना १३, तर खंडारे यांना ५ मते मिळाली. त्यामुळे भैयासाहेब तिडके सभापती म्हणून निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. उपसभापती पदासाठी सहकार गटाचे गणेशराव महल्ले तर शेतकरी विकास आघाडीकडून संजय वानखडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात महल्ले यांना १३, तर वानखडे यांना ५ मते मिळाली. त्यामुळे गणेशराव महल्ले उपसभापती पदी निवडून आले. मतदान करण्यासाठी संचालक डॉ. अमित कावरे, प्रशांत कांबे, राजेश कांबे, साहेबराव ठाकरे, शरद बोबडे, मधुकर हेरोळे, शोभा तिडके, चित्रा सरोदे, महादेवराव तिरकर, श्यामसुंदर अग्रवाल, कीर्तीकुमार भारूका, सुनील सरोदे, रामचंद्र खंडारे, संजय वानखडे, सुमनबाई वानखडे, अ. कय्युम शे. महेबूब हे संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साहाय्यक निबंधक डी. आर. पिंजरकर यांनी काम पाहिले. त्यांना बाजार समिती सचिव उमेश मडगे यांनी सहकार्य केले.