Bhaiyyuji Maharaj suicide : भय्युजी महाराजांची नाळ बार्शीटाकळीतील तामशीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:37 PM2018-06-13T13:37:01+5:302018-06-13T13:37:01+5:30
अकोला : आध्यात्मिक आणि राजकीय गुरू भय्युजी महाराज यांची नाळ बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद जवळच्या तामशी गावाशी जुळलेली आहे. हे त्यांच मुुळगाव आहे. भय्युजी महाराज ऊर्फ उदयसिंग विश्वासराव देशमुख यांचे आजोबा श्यामराव देशमुख मध्यप्रदेशातील शूजालपूर येथे दत्तक गेले होते; तेव्हापासून ते तेथे आहेत. तेथेचे भय्युजी महराजांचा जन्म झारला. पण भय्युजी महाराजांची कौटुंबिक नाळ तामशीशी कायमची जुळलेली होती.
- संजय खांडेकर
अकोला : आध्यात्मिक आणि राजकीय गुरू भय्युजी महाराज यांची नाळ बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद जवळच्या तामशी गावाशी जुळलेली आहे. हे त्यांच मुुळगाव आहे. भय्युजी महाराज ऊर्फ उदयसिंग विश्वासराव देशमुख यांचे आजोबा श्यामराव देशमुख मध्यप्रदेशातील शूजालपूर येथे दत्तक गेले होते; तेव्हापासून ते तेथे आहेत. तेथेचे भय्युजी महराजांचा जन्म झारला. पण भय्युजी महाराजांची कौटुंबिक नाळ तामशीशी कायमची जुळलेली होती.
भय्युजी महाराजांचे काका-चुलते अजूनही बार्शीटाकळीतील तामशी येथे वास्तव्यास असून, येथे त्यांचा वाडा आहे. प्रकाश लक्ष्मणराव देशमुख, शिवाजी लक्ष्मणराव देशमुख, रमेश लक्ष्मणराव देशमुख, सुरेश कृ ष्णराव देशमुख, कैलास कृष्णराव देशमुख हे त्यांचे काका तामसी गावाकडेच असतात. भय्युजी महाराज यांचे वडील विश्वासराव आणि त्यांची आई नियमित गावात येत असे. भय्युजी महाराजांचे आजोबा श्यामराव देशमुख मध्यप्रदेशातील शूजालपूर येथे दत्तक दिल्यापासून हा परिवार तिकडेच स्थिरावला; मात्र भय्युजी महाराजांकडून नेहमी तामशीच्या नावाने निमंत्रण पत्रिका पाठविल्या जायच्या. या सर्व पत्रिका पोहोचविण्याची जबाबदारी शिवराज पाटील यांच्यावर राहायची, अशी माहिती पंकज देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.
२० वर्षांपासून आध्यात्मिक आणि राजकीय गुरू म्हणून भय्युजी महाराज नावारूपास आल्यानंतर त्यांची अकोल्यातील नाळ अधिक घट्ट झाली. भय्युजी महाराजांचे प्राचार्य डॅडी देशमुखांकडे यांच्याकडे येणे-जाणे वाढले. उमरीतील अभिरूची गार्डनमध्ये त्यांचे सातत्याने कार्यक्रम होत असत. त्यावेळी एक महिला एका लहान मुलासह भय्युजी महाराजांच्या भेटीला यायची. त्या महिलेला ते नियमित आर्थिक मदत करीत असत. अनेकदा ते डॅडींच्या कुटुंबियांनादेखील या महिलेस मदत करण्याचे सांगायचे. नंतर ही मदत कशासाठी होते, याचा उलगडा झाला. डॅडींचे चिरंजीव, केमिकल इंजिनिअर असलेले पंकज देशमुख यांना बोलावून त्यांनी अकोल्यात एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी प्रकल्प उभारण्याची संकल्पना मांडली. अकोला मलकापूर परिसरात सूर्यादय बालगृह संस्था उभारली गेली. पंकज देशमुख आणि संदीप फोकमारे यांनी ही धुरा खांद्यावर घेतली. सुरुवातीला केवळ तीन मुलांचा सांभाळ येथे व्हायचा. आता ही संख्या वाढली . सूर्योदय बालगृहाचा दर महिन्याला दीड लाख रुपये खर्च येतो. हा खर्च कार्यकर्त्यांच्या वर्गणीतून तर कधी भय्युजी महाराजांच्या आश्रमातून केला जातो. आध्यात्मिक आणि राजकीय गुरू असलेल्या भय्युजी महाराजांच्या अंत्यविधीसाठी अकोला जिल्ह्यातील हजारो समर्थक इंदोरकडे रवाना झाले. त्यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख, अतुल पाटील, दत्ता देशमुख आणि अजय सोनोने हेदेखील रवाना झाले आहेत.