बाबा रामदेव महाेत्सवात भजन संध्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:18 AM2021-02-13T04:18:29+5:302021-02-13T04:18:29+5:30
अकाेल्यात खेलाे इंडिया शूटिंग निवड चाचणी अकाेला : भारतीय क्रीडा प्राधिकरण तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या ...
अकाेल्यात खेलाे इंडिया शूटिंग निवड चाचणी
अकाेला : भारतीय क्रीडा प्राधिकरण तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने खेलाे इंडिया शूटिंग निवड चाचणीचे आयाेजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी १५ फेब्रवारीपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.
शिवणी येथे श्रामनेर शिबिर
अकाेला : शिवणी येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिर व धम्म परिषदेचे आयाेजन करण्यात आले आहे. या शिबिरात अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे अध्यक्ष भन्ते बी संघपाल महाथेराे हे मागर्दर्शन करत आहेत.
श्रीराममंदिर बांधकामासाठी निधी
अकाेला : सावरकर विचारांचे कट्टर समर्थक ॲड शैलेश जाेशी यांनी श्रीराममंदिर उभारणीसाठी एक लाखाचा निधी दिला. आमदार गाेवर्धन शर्मा नगर संघचालक गाेपाल खंडेलवाल यांच्याकडे हा निधी सुपुर्द करण्यात आला
ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरू करा
अकाेला : जिल्ह्यातील अनेक गावांमधील बसफेऱ्या अजूनही बंदच आहेत. काेराेनाचे निर्बंध हटवित पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्यावरही अकाेला आगाराने अजूनही बसफेऱ्या सुरू करण्याचे नियाेजन करण्यात आलेले नाही.
स्वातंत्र्यसैनिकाची माहिती सादर करा
अकोला : सद्य:स्थितीत हयात असलेल्या स्वातंत्र्यसैनिक व विधवा पत्नी यांची माहिती दिलेल्या विवरणपत्रानुसार शासनास सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. हयात असलेले व शासनामार्फत निवृत्तिवेतन घेत असलेले स्वातंत्र्यसैनिक तसेच त्यांच्या मृत्यूपश्चात निवृत्तिवेतन घेत असलेल्या त्यांच्या विधवा पत्नींची माहिती दिलेल्या विवरणपत्रानुसार आवश्यक कागदपत्रांसह आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, स्वातंत्र्यसैनिक सन्मानपत्र, स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र, पीपीओ क्रमांकासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नझारत शाखेत जमा करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.