भारत राखीव बटालियनच्या शासन निर्णयात ‘तेल्हारा’ नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 03:46 PM2019-09-14T15:46:19+5:302019-09-14T15:46:45+5:30
शासन निर्णयात अकोल्याच्या शिसा उदेगावचाच उल्लेख करण्यात आला असून तेल्हाºयाच्या तेळगाव वडनेरचा उल्लेखचा नसल्याचे समोर आले आहे.
अकोला: तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर शिवारात होणाऱ्या भारत राखीव बटालियन कॅम्प तेल्हारा ऐवजी अकोल्यातील शिसा उदेगाव व हिंगणा शिवारात करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयावरून अकोट मतदारसंघातील राजकारण तापले होते. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. या मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सारी राजकीय ताकद पणाला लावून मंत्रिमंडळाचा निर्णय फिरविला अन् ही बटालियन पूर्ववत तेल्हाºयातच होईल, असे मुख्यमंत्र्यांचे पत्रही आणले; मात्र १३ सप्टेंबर रोजी शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या शासन निर्णयात अकोल्याच्या शिसा उदेगावचाच उल्लेख करण्यात आला असून तेल्हाºयाच्या तेळगाव वडनेरचा उल्लेखचा नसल्याचे समोर आले आहे.
भारत राखीव बटालियन हा कॅम्प तेल्हारा तालुक्यातील तळेगाव वडनेर शिवारात होणार होता. यासाठी २०० एकर जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते स्थळ बदलून हा कॅम्प शिसा उदेगाव शिवारात मंजूर करण्यात आला होता. राज्यात यापूर्वी तीन ठिकाणी भारत राखीव बटालियन स्थापन करण्यात आली असून, या बटालियनद्वारे कायदा-सुव्यवस्था आणखी प्रभावीपणे सांभाळण्यास मदत होत आहे. ही बाब लक्षात घेता, राज्यात दोन अतिरिक्त बटालियन स्थापन करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.४ आणि अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्यात शिसा उदेगाव व हिंगणा शिवार येथे भारत राखीव बटालियन क्र.५ ची निर्मिती करण्यात येणार आहे. या सर्व कॅम्पसाठी पदांची भरती करण्याकरिता शासन निर्णय आवश्यक होता. त्यामुळे यांनी ६ सप्टेंबर रोजी...पत्र देऊन शासन निर्णय देण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे...यांच्या पत्रातही तळेगाव वडनेरऐवजी शिसा उदेगाव याच गावाचा उल्लेख होता. त्यानुसार गृह विभागाने ६७२ पदांच्या भरतीसाठी १६३ कोटी ४५ लाख ५८ हजार ४८६ रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय शुक्रवारी काढला आहे. या निर्णयामुळे अकोट मतदारसंघात आ. भारसाकळे यांच्या विरोधाकांच्या हाती पुन्हा एकदा मुद्दा मिळाला असून राजकारण तापणार असल्याची चिन्हे आहेत.
शिसा उदेगाव संदर्भातील निर्णयाला खुद्द मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देत हा कॅम्प तेल्हाºयाच्या तळेगाव वडनेर शिवारातच होईल, अशी लेखी ग्वाही दिली आहे. १३ सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय हा गृह विभागाचा असून, तो पद भरतीचा आहे. कॅम्पसाठी जागेचा शासन निर्णय हा तळेगावचाच निघेल व कॅम्प हा तेल्हाºयातच होईल, याबाबत माझ्या मनात कुठेही शंका नाही. तांत्रिक बाबी लवकरच पूर्ण होतील.
- प्रकाश भारसाकळे, आमदार