भरधाव बोलेरोची दुचाकीला जबर धडक, सहा जण जखमी, दक्षता नगरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 09:18 PM2017-12-09T21:18:08+5:302017-12-09T21:18:27+5:30
नेहरु पार्क चौकातून वाशिम बायपासकडे जात असलेल्या एका भरधाव बोलेरो चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली.
अकोला - नेहरु पार्क चौकातून वाशिम बायपासकडे जात असलेल्या एका भरधाव बोलेरो चारचाकी वाहनाने दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या अपघातात ८ जन जखमी झाले असून दोघांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयामध्ये तर बोलेरो वाहनातील सहा जणांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात बोलेरो चारचाकी वाहन तीन ते चार वेळा पलटी झाल्यानंतर ते रोडच्या खाली जाउन कोसळले.
सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी यांचे पती राजु विश्वंभर मोगली पिल्लू हे दोन वर्षीय चिमुकला मुलगा गणेश राजू मोगली पिल्लू चिमुकला याला सोबत घेउन पत्नीला घेण्यासाठी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात एम एच ३० एयू १६२५ क्रमांकाच्या दुचाकीने दक्षता नगरमधून निमवाडीकडे जात असतांना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या एम एच ३० एझेड २३५ क्रमांकाच्या बोलेरो वाहनाने जबर धडक दिली.
या अपघातात दुचाकी दुरवर फेकल्या गेल्याने दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर बोलेरो चारचाकी वाहनाने तीन ते चार पलटी खाउन हे वाहन रस्त्याच्या खाली कोसळल्यानंतर या वाहनामधील चार जन गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या सहाही जनांना तातडीने उपचरासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच वाहतुक शाखेचे अधिकारी व कर्मचारी खदान पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी जखमींना उपचरासाठी रुग्णालयात पाठवून वाहनांची तपासणी केली. यामधील बोलेरो वाहनात मद्याची दुर्गंधी आली असून पोलिसांनी पंचनामा केला आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिसात तक्रार झालेली नव्हती.