सातपैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप-बमसंचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 05:40 PM2020-01-16T17:40:46+5:302020-01-16T17:40:50+5:30
अकोला जिल्ह्यातील सात पैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप बमसंने झेंडा फडकावला आहे.
अकोला : अकोला जिल्ह्यातील सात पैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप बमसंने झेंडा फडकावला आहे. सातही पंचायत समितींच्या सभापतींची १६ जानेवारी रोजी निवड प्रक्रीया पार पाडली. अकोला,अकोट, बाळापूर, तेल्हारा आणि बाशीटाकळी या पंचायत समित्यांमध्ये भारीप-बमसंने आपले वर्चस्व सिद्ध केले. मूर्तिजापूरमध्ये काँग्रेस तर पातुरात शिवसेनेने बाजी मारली.
अकोला पंचायत समिती सभापतीपदी भारीप-बमसंच्या वसंतराव नागे यांची तर उपसभापतीपदी रिता ढवळी यांची निवड करण्यात आली. बाळापुर पंचायत समितीच्या सभापतीपदी भारीप-बमसंच्या रुपाली मंगेश गवई, तर उपसभापतीपदी धनंजय दांदळे यांनी विजय मिळविला. अकोट पंचायत समितीच्या सभापतीपदी लता शत्रुघ्न नितोने तर उपसभापतीपदी निलेश झाडे यांनी विजय मिळविला. तेल्हारा पंचायत समिती सभापतीपदि रफत सुलताना यांनी विजय मिळविला तर उपसभापती काँग्रेसच्या प्रतिभा इंगळे यांची निवड करण्यात आली.
बार्शीटाकळी पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रकाश वाहुरवाघ यांनी विजय मिळविला तर उपसभापतीपदी भाजपच्या अनुसया राठोड यांची निवड करण्यात आली.पातूर पंचायत समितीच्या शिवसेनेच्या लक्ष्मीबाई जनार्दन डाखोरे यांची तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या नजमुन्नीसा मो. इब्राहिम यांची निवड करण्यात आली.मूर्तिजापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या उर्मिला डाबेराव तर उपसभापतीपदी शिवसेनेचे सुभाष राऊत यांची निवड करण्यात आली.
अकोला पंचायत समिती
सभापती- वसंतराव नागे(वंचित बहुजन आघाडी),
उपसभापती पदासाठी रिता ढवळी(वंचित बहुजन आघाडी)
अकोट पंचायत समिती
सभापती- लता नितोने (वंचित बहुजन आघाडी)
उपसभापती- निलेश झाडे (वंचित बहुजन आघाडी)
पातूर पंचायत समिती
सभापती- लक्ष्मीबाई जनार्दन डाखोरे (शिवसेना)
उपसभापती- नजमुन्नीसा मो इब्राहिम (काँग्रेस)
बाळापूर पंचायत समिती
सभापती- रुपाली गवई (वंचित बहुजन आघाडी)
उपसभापती - धनंजय दांदळे (वंचित बहुजन आघाडी)
तेल्हारा पंचायत समिती
सभापती- रफत सुलताना(वंचित बहुजन आघाडी)
उपसभापती- प्रतिभा इंगळे (काँग्रेस)
मूर्तिजापूर पंचायत समिती
सभापती - उर्मिला डाबेराव (काँग्र्रेस)
उपसभापती - सुभाष राऊत (शिवसेना)
बार्शीटाकळी पंचायत समिती
सभापती- प्रकाश वकीलाजी वाहुरवाघ (वंचित बहुजन आघाडी)
उपसभापती-अनुसया वसंत राठोड (भाजप)