भारिप-बमसंचा घेराव; भाजपाने केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 07:53 PM2017-08-18T19:53:38+5:302017-08-18T20:02:34+5:30
अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने अवाजवी करवाढ केल्याच्या निषेधार्थ भारिप-बमसंने भाजपा पदाधिकार्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यानुषंगाने शुक्रवारी सकाळी भारिपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्या निवासस्थानी धडक दिली अस ता, भाजपाच्या पदाधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांचे यथोचित स्वागत करीत निवेदन स्वीकारले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने अवाजवी करवाढ केल्याच्या निषेधार्थ भारिप-बमसंने भाजपा पदाधिकार्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता. त्यानुषंगाने शुक्रवारी सकाळी भारिपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्या निवासस्थानी धडक दिली अस ता, भाजपाच्या पदाधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांचे यथोचित स्वागत करीत निवेदन स्वीकारले.
सर्वसामान्य अकोलेकरांना मूलभूत सुविधांची पूर्तता न कर ता सत्ताधारी भाजपाने प्रचंड प्रमाणात करवाढ केली. यामुळे अकोलेकरांवर आर्थिक बोजा निर्माण झाल्याचा आरोप करीत विरोधी पक्ष भारिप-बहुजन महासंघाने सत्ताधार्यांसह प्रशासनाविरोधात विविध आंदोलने छेडली होती. १९ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सभागृहात आयोजित केल्या जाणार्या सर्वसाधारण सभेत सत्ताधार्यांनी एकूण कर रकमेच्या दहा टक्के रक्कम सूट देण्याचा विषय पटलावर घे तला आहे. प्रशासनाने संपूर्ण करवाढ रद्द करण्याची मागणी भारिप-बमसंने केली असून, सर्वसाधारण सभेपूर्वी १८ ऑगस्ट (शुक्रवार) रोजी सत्ता पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव घालण्याचा निर्णय भारिपने घेतला होता. त्यानुषंगाने भारि पच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी नियोजनानुसार महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्या निवासस्थानी धाव घेतली अस ता, भाजपाच्या पदाधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांचे यथोचित स्वागत केल्यामुळे काही क्षणासाठी आंदोलनकर्तेही बुचकळ्यात पडल्याचे चित्र होते. भारिपचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुच्र्या, चहा, नाश्त्याची व्यवस् था करण्यात आल्याचे यावेळी दिसून आले. अशा खेळीमेळीच्या वातावरणात भाजपाच्या पदाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार केला, हे येथे उल्लेखनीय.
उपमहापौर, सभापतींना निवेदन
उपमहापौर वैशाली शेळके यांना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, माजी मंत्री दशरथ भांडे, माजी जि.प. अध्यक्ष बालमुकुंद भिरड, नगरसेविका किरण बोराखडे, प्रा. प्रसन्नजित गवई, बुद्धरत्न इंगोले यांनी निवेदन दिले. स्थायी समिती सभापती बाळ टाले यांना नगरसेवक बबलू जगताप व इतर कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले. भारिपने केलेल्या नियोजनानुसार अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले.
महापौरांची अनुपस्थिती
महापौर विजय अग्रवाल यांना निवेदन देण्याची जबाबदारी आ.बळीराम सिरस्कार, माजी आ.हरिदास भदे, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, प्रतिभा अवचार, मनपातील गटनेत्या अँड.धनश्री देव, जि.प. सभापती देवकाबाई पातोंड, शोभा शेळके, सरला मेश्राम, डॉ. राजकुमार रंगारी, माजी नगरसेविका वंदना वासनिक, गजानन गवई, सुनील जगता प यांच्याकडे होती. महापौर अग्रवाल बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका सुनीता अग्रवाल यांनी निवेदन स्वीकारले.