करवाढीविरोधात भारिप-बमसंचे स्वाक्षरी अभियान
By admin | Published: May 2, 2017 01:28 AM2017-05-02T01:28:25+5:302017-05-02T01:28:25+5:30
अकोला: महापालिका प्रशासनाने मालमत्तांची केलेली करवाढ मागे घेण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी सकाळी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.
करवाढ मागे घेण्यासाठी एक महिन्याचा अल्टीमेटम
अकोला: महापालिका प्रशासनाने मालमत्तांची केलेली करवाढ मागे घेण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी सकाळी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. खंडेलवाल टॉवर येथे अकोलेकरांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. येत्या महिनाभराच्या कालावधीत प्रशासनाने ही करवाढ त्वरित मागे घेण्याचा अल्टीमेटम भारिपने दिला आहे.
महापालिकेने २०१७-१८ ते २०२०-२२ पर्यंतच्या कालावधीसाठी महापालिका क्षेत्रातील मालमत्तांची (ईमारती व जमिनी) सुधारित दराने करवाढ केली. ही करवाढ सुमारे ३० ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक असून, हा सर्वसामान्य अकोलेक रांवर अतिरिक्त भार असल्याचे भारिप-बमसंने नमूद केले आहे. प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी केलेली करवाढ अकोलेकरांवर अन्यायकारक असून, त्या बदल्यात मूलभूत सुविधांची वाणवा आहे. ही करवाढ मागे घ्यावी यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. अभियानात भारिपच्या मनपा गटनेत्या अॅड. धनश्री देव, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई वाघोडे, गजानन गवई, रणजित वाघ, नगरसेवक बबलू जगताप, नगरसेविका किरण बोराखडे, अरुंधती शिरसाट, रामा तायडे, वंदना वासनिक, मंगला घाटोळे, पराग गवई, अरुण बलखंडे, डॉ. राजकुमार रंगारी, भारत दवने आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.