भारिपचे जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य लागले कामाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:36 PM2019-01-09T12:36:35+5:302019-01-09T12:36:43+5:30
अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य कामाला लागले असून, गावा-गावांत पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत.
अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य कामाला लागले असून, गावा-गावांत पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत.
भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशानुसार भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसह सदस्यांनीही गत दहा दिवसांपासून जिल्ह्यातील गावा-गावांत दौरा करून पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पक्षाची भूमिका यासंदर्भात गावपातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. नेमून दिलेल्या तालुक्यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह सदस्य दररोज सात-आठ गावांना भेटी देत पक्ष कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहेत.
पदाधिकाºयांकडे तालुकानिहाय अशी देण्यात आली जबाबदारी!
गावा-गावांत भेटी देऊन पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासाठी भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांकडे तालुकानिहाय जबाबदारी पक्षाच्यावतीने सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्याकडे मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुका, उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण यांच्याकडे पातूर व बाळापूर तालुका, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्याकडे अकोट व तेल्हारा तालुका आणि समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे यांच्याकडे अकोला तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये संबंधित पदाधिकाºयांसह तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य गावांमध्ये जाऊन पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्याच्या कामात गुंतले आहेत.