भारिपच्या ६१ उमेदवारांचे अर्ज दाखल !
By admin | Published: February 4, 2017 02:29 AM2017-02-04T02:29:31+5:302017-02-04T02:29:31+5:30
निवडणूक उपसमितीने जाहीर केली उमेदवारांची यादी.
अकोला, दि. 0४- महानगरपालिका निवडणुकीसाठी भारिप-बहुजन महासंघ निवडणूक निरीक्षक उपसमितीने पक्षाच्या ६१ उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर केली असून, उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या भारिप-बमसंच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
अकोला महानगरपालिकेची निवडणूक भारिप-बमसं स्वबळावर लढवित आहे. त्यासाठी भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीमार्फत प्रभागनिहाय निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी मान्यता दिली.
पक्षाच्यावतीने निश्चित करण्यात आलेल्या ६१ उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे टाळून, उमेदवारी निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांना गुरुवारी रात्री व शुक्रवारी सकाळी भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीकडून ह्यएबी फॉर्मह्ण चे वाटप करण्यात आले. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी )अधिकृत उमेदवार म्हणून भारिप-बमसंच्या ६१ उमेदवारांनी महानगरपालिकेत उमेदवारी अर्ज दाखल केले. पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी भारिप-बमसं निवडणूक निरीक्षक उपसमितीमार्फत पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.