शेतकरी, शेतमजुरांना पेन्शनसाठी भारतीय संग्राम परिषदेचा लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 06:06 PM2019-01-05T18:06:07+5:302019-01-05T18:06:12+5:30
अकोला : शेतकरी व शेतमजूरांचे दु:ख जाणून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने कंबर कसली आहे.
अकोला : शेतकरी व शेतमजूरांचे दु:ख जाणून त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने कंबर कसली आहे. भारतीय संग्राम परिषद राज्यभरात शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन योजना शासनाकडून लागू करवून घेण्यासाठी लढा देणार आहे. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनात शिवसंग्राम प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वात हा लढा लढल्या जाणार आहे.
जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाठया शेतकऱ्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत मातीत राब राब राबवावे लागते. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ शेतकºयांना अश्रू गाळायला लावतो. तरीही प्रत्येक परिस्थितीत हिंमतआणि धैर्य एकवटून शेतकरी शेती कसत राहतो. एवढे करुनही नशीबी सुखाचे जिवन नसतेच. मुला मुलींना उच्च शिक्षण घेता येत नाही. मुला मुलींचे लग्न जुळविण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत संपूर्ण जीवन घालविल्यानंतर उतार वयात शेतात काम करण्या इतकी शक्ती शेतकरी व शेतमजूरांमधे राहत नाही.
त्यामुळेच ६० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या स्त्री, पुरुष शेतकरी व शेतमजूरांना स्वाभीमानाने जगता यावे यासाठी शासनाने अशा शेतकरी व शेतमजुरांसाठी प्रतिमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळावे म्हणून पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकºयांच्या हक्कासाठी लढा उभारला आहे. यामधे ६० वर्षांपेक्ष अधिक वय असलेल्या शेतकरी व शेत मजुरांकडून रितसर अर्ज भरवून घेतल्या जात आहेत. हे सर्व अर्ज आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्र्यांना सोपविल्या जाणार आहे. या शिवसंग्रामच्या व भारतीय संग्राम परिषदेच्या लढ्यामधे जास्तीत जास्त शेतकरी व शेतमजुरांनी सहभागी होवून पेन्शन योजनेच्या मागणीसाठी अर्ज भरुन द्यावे, असे आवाहन शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे