भाऊसाहेब भिरडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:19 AM2021-03-17T04:19:23+5:302021-03-17T04:19:23+5:30

----------------------- चोहोट्टा बाजार येथील आठवडी बाजार बंद चोहोट्टा बाजार : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली ...

Bhausaheb Bhirde passed away | भाऊसाहेब भिरडे यांचे निधन

भाऊसाहेब भिरडे यांचे निधन

Next

-----------------------

चोहोट्टा बाजार येथील आठवडी बाजार बंद

चोहोट्टा बाजार : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभांवर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार चोहोट्टा बाजार येथील दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी मास्क वापरासह फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

----------------------------------

बोरगाव मंजू येथे मोकाट श्वानांचा उपद्रव

बोरगाव मंजू : गावातील काही भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट श्वानांमुळे लहान मुले, वृद्धांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. श्वानदंशाच्याही घटना घडत आहेत.

------------------------------------------

वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ

मुंडगाव : सध्या उन्हाची चाहूल लागली असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तालुक्यातील वन खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे वृक्षतोड वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ होत आहे.

----------------------------------------------------

रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी

बाळापूर : माझोड-वाडेगाव या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. या मार्गाने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

----------------------------

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था

तेल्हारा : तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिली आहेत. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

------------------------------

इंधन दरवाढीमुळे यांत्रिक मशागत महागली

बार्शीटाकळी : पेट्राेल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारक चांगलेच हतबल झाले आहेत. इंधन दरवाढीचा जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवत असतानाच ट्रॅक्टरची मशागतही महागली आहे. त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस येत असल्याचे दिसून येते.

---------------------------------

बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण

हाता : ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून बसफेऱ्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे या संधीचा लाभ घेत खासगी वाहनचालकांनी भाडेवाढ केली आहे.

---------------------------------------------

लसीकरणाचा वेग वाढला

पातूर : येथील लसीकरण केंद्रात आता लसीकरणाचा वेग वाढला असून, कोविड लसीकरणासाठी ज्येष्ठांचा प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित असून, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

--------------------------------------------------------

रस्त्यालगत भाजी विक्रेत्यांचा ठिय्या

अकोट : शहरातील प्रमुख रस्त्यांवर, चौकालगत भाजी, फळ, तसेच कपडे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. पालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची गरज आहे.

-------------------------------------------

वाडेगावी मोफत लसीकरणास सुरुवात

वाडेगाव: आरोग्य केंद्रांतर्गत वाडेगाव व परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना व ४५ वर्षीय दुर्धर आजारी नागरिकांना कोविड १ मोबाइल ॲपवर नोंदणी करून मोफत लसीकरण सुरू केले आहे. लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ. भावना हाडोळे यांनी केले आहे.

----------------------------------------------

कोरोना चाचणीकडे नागरिकांची पाठ

अडगाव : येथील आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनामार्फत गावामध्ये कोरोना तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे; परंतु शिबिराकडे नागरिक पाठ फिरवित असल्याचे चित्र दिसून येत आहे.

--------------------------------------------

चिखलगावात नागरिक बेफिकीर

चिखलगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक बेफिकीर वावरताना दिसत आहेत. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर कोणीच करताना दिसत नाही. त्यामुळे ग्रा. पं. ने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------------

कोरोना लसीकरणास ज्येष्ठांचा प्रतिसाद

पातूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात १ मार्चपासून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. लसीकरण मोहिमेला ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील मळसूर, सस्ती, आलेगाव या ठिकाणी लसीकरण सुरू आहे.

-----------------------------------------

तळेगाव बाजार येथील यात्रोत्सव रद्द

तळेगाव बाजार : येथे दरवर्षी होणारा महाशिवरात्री यात्राेत्सव यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आला. सोमेश्वर मंदिरात यात्राोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आला.

---------------------------------------------

बोरगावात मास्कला वाढली मागणी

बोरगाव मंजू : कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. गावामध्ये मास्कला मागणी वाढली असून, विक्रेत्यांनीसुद्धा विविध प्रकारचे मास्क उपलब्ध केले आहेत. बाजारपेठेत नागरिक मास्क वापरत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Bhausaheb Bhirde passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.