नवयुग विद्यालयात भीम जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:17 AM2021-04-15T04:17:40+5:302021-04-15T04:17:40+5:30

-------------------------- अनभोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन बोरगाव मंजू : अनभोरा येथील भाऊसाहेब बिडकर विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार ...

Bhim Jayanti in New Age School | नवयुग विद्यालयात भीम जयंती उत्साहात

नवयुग विद्यालयात भीम जयंती उत्साहात

Next

--------------------------

अनभोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बोरगाव मंजू : अनभोरा येथील भाऊसाहेब बिडकर विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख हेमंत कुलकर्णी होते, तर प्रमुख उपस्थिती शाळेचे मुख्याध्यापक विजय इंगळे, अध्यापक संजय तायडे, मधुसूदन ढोरे ,किरण इंगळे, रामदास धुळे, संजय गावंडे, मनोज बाईस्कर, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात केंद्र प्रमुख हेमंत कुलकर्णी, मुख्याध्यापक विजय इंगळे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय गावंडे यांनी तर आभार प्रदर्शन मधुसूदन ढोरे यांनी मानले.

-----------------------------

माळेगाव बाजार येथे भीम जयंती साजरी

माळेगाव बाजार: येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात सुरुवातीला सरपंच संजय बगाडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच अकलीम खा साहेब, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

------------------------------------

मळसूर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

मळसूर: येथील बौद्ध विहारात विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे पूजन उपसरपंच कांताबाई कंकाळ यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शिवाजी देवकते यांनीही पूजन करून अभिवादन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पंढरी गडदे, पूजा कंकाळ, शिवाजी काळे, अरुण देवकते, जगदीश देवकते, मनोज काळे, विजय काळे, अमजद शेठ, गोपाल गायकी, गजानन मदने, गंगाधर कंकाळ, नारायण कंकाळ, गोपाल कंकाळ, राजू कंकाळ, शिवाजी कंकाळ, जनार्धन देवकते आदी उपस्थित होते. कार्यक्रमात कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रेम कंकाळ यांनी मानले.

Web Title: Bhim Jayanti in New Age School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.