अकोला जिल्ह्यातील ‘चांदूर’ची भेंडी दुबईला रवाना; दर दिवसाला ५० क्विंटल भेंडीची निर्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:08 PM2018-08-21T13:08:31+5:302018-08-21T13:13:32+5:30
अकोला : जिल्ह्यातील चांदूर येथील भेंडी आखाती देशात निर्यात करण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार दर दिवसाला ५० क्विंटल भेंडीची निर्यात रविवारपासून सुरू करण्यात आली असून, सोमवारी चांदूर येथील ५० क्विंटल भेंडी दुबईला रवाना करण्यात आली.
- संतोष येलकर
अकोला : जिल्ह्यातील चांदूर येथील भेंडी आखाती देशात निर्यात करण्याचा करार करण्यात आला आहे. त्यानुसार दर दिवसाला ५० क्विंटल भेंडीची निर्यात रविवारपासून सुरू करण्यात आली असून, सोमवारी चांदूर येथील ५० क्विंटल भेंडी दुबईला रवाना करण्यात आली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील केळी, डाळिंबासह भेंडी व मिरची आखाती देशात निर्यात करण्याचा करार गत महिन्यात संंबंधित कंपन्यांसोबत करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील भेंडी निर्यातीचा करार मोर्णा व्हॅली शेतकरी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्यावतीने नागपूर येथील युवा एक्सपोर्ट कंपनीसोबत करण्यात आला. त्यानुसार यावर्षीच्या हंगामात चांदूर येथील भेंडी निर्यात १९ आॅगस्टपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये २० आॅगस्ट रोजी चांदूर येथील शेतकºयांची ५० क्विंटल भेंडी दुबईकडे रवाना करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील चांदूर येथील भेडी उत्पादक ५० शेतकºयांची भेंडी दुबईला निर्यात करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये दर दिवसाला ५० क्विंटल भेंडी दुबईला पाठविण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर यांच्यासह चांदूर येथील भेंडी उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार संबंधित कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थितीत १९ आॅगस्ट रोजी चांदूर येथील भेंडी दुबईला रवाना करण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील चांदूर येथील भेंडीची निर्यात सुरू करण्यात आली आहे. सोमवारी ५० क्विंटल भेंडी दुबईला पाठविण्यात आली आहे. ५० शेतकºयांच्या शेतातील भेंडीची निर्यात करण्यात येणार असून, दर दिवसाला ५० क्विंटल भेंडी दुबईला पाठविण्यात येणार आहे.
- अशोक अमानकर
उपजिल्हाधिकारी (रोहयो),
अकोला.