भोंदु बाबाचा विवाहितेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 05:26 PM2017-10-14T17:26:56+5:302017-10-14T17:28:52+5:30
तेल्हारा (जि. अकोला): पतीसाठी औषध मागायला आलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेवर पंचगव्हाण येथील भोंदु बाबाने बलात्कार केल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी घडली.
तेल्हारा (जि. अकोला): पतीसाठी औषध मागायला आलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेवर पंचगव्हाण येथील भोंदु बाबाने बलात्कार केल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी घडली. विवाहितेच्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी भोंदु बाबाविरुद्ध १४ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
तालुक्यातील पंचगव्हाण येथील नईम बाबा हा विविध आजारावर करणीचे, टुक, भूतबाधा आदीवर उपचाराची बतावणी करून ग्रामस्थांची दिशाभूल करीत होता. या बाबाकडे आपल्या पतीसाठी औषध आणालयला तळेगाव बाजार येथील एका १९ वर्षीय विवाहिता १२ आॅक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या गेली होती. त्यावेळी बाबाने विवाहितेच्या पतीला बाहेर पाठवले. तसेच तुझ्या पतीच्या अंगात भूत असून तो काढण्यासाठी तुला काही त्याग करावा लागेल असे सांगितले. तसेच खोलीचा परदा बंद करून विवाहितेवर बलात्कार केला.विवाहितेने विरोध केला बाबाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घरी कुणालाही न सांगता पीडिता रडत होती. त्यांनी विचारल्यावर हिंमत करून विवाहितेने तेल्हारा पो. स्टे. मध्ये तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय संतोष गवळी, संतोष केदासे, सागर मोरे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
दर गुरुवारी भरत होता दरबार
नईम बाबा याचा पंचगव्हाण येथे दर गुरुवारी दरबार भरत होता. या दरबारात हा बाबा भूत, करणी व इतर आजारांवर उपचार करीत असे. तसेच रुग्णांना औषधीही लिहून देत होता. या दरबारात २०० ते २५० महिलांसह पुरुषही सहभागी होत होते.अंधश्रद्धेतून आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याचे तपासात उघड होउ शकते.
बाबांच्या बचावसाठी भक्तांचा दबाव
भोंदु बाबा विरुद्ध गुन्हा दाखल करून यासाठी या बाबाच्या भक्तांनी तेल्हारा पोलिस स्टेशन गाठले होते. १०० लोकांच्या जमावाने गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. तसेच या जमावाने विवाहितेवर तक्रार न देण्यासही दबाव आणला. परंतु, विवाहिता आपल्या फिर्यादीवर ठाम राहिल्याने तेल्हारा पोलिसांनी भोंदु बाबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फोटो