‘त्या’ भोंदूबाबाला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 07:59 PM2017-10-15T19:59:52+5:302017-10-15T20:21:50+5:30

तेल्हारा : पतीच्या औषधासाठी आलेल्या विवाहितेवर बलात्कार  करणार्‍या पंचगव्हाण येथील नईमबाबाला तेल्हारा न्यायालयाने  २0 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

'That' bhondubabala police cellar | ‘त्या’ भोंदूबाबाला पोलीस कोठडी

‘त्या’ भोंदूबाबाला पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देपंचगव्हाण येथील नईमबाबाविवाहितेवर बलात्का बलात्कारउपचाराची बतावणी करून ग्रामस्थांची करीत होता दिशाभूल  

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : पतीच्या औषधासाठी आलेल्या विवाहितेवर बलात्कार  करणार्‍या पंचगव्हाण येथील नईमबाबाला तेल्हारा न्यायालयाने  २0 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 तालुक्यातील पंचगव्हाण येथील नईमबाबा हा विविध आजार  करणी, भूतबाधा आदींवर उपचाराची बतावणी करून ग्रामस् थांची दिशाभूल करीत होता. या बाबाकडे आपल्या पतीसाठी  औषध आणायला तळेगाव बाजार येथील एक १९ वर्षीय  विवाहिता १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३0 वाजता गेली होती.  त्यावेळी बाबाने विवाहितेवर बलात्कार केला होता. जीवे  मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी विवाहितेच्या  फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी नईमबाबाविरुद्ध ३७६ नुसार  गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये १५ ऑक्टोबर रोजी  जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलमांची वाढ करण्यात आली  आहे. आरोपी बाबाला तेल्हारा पोलिसांनी १५ ऑक्टोबर रोजी  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २0 ऑ क्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास  तेल्हारा पोलीस करीत आहेत. छप्पर बंद समाजाने १५ ऑ क्टोबर रोजी तेल्हारा ठाणेदारांना निवेदन देऊन आरोपीवर कठोर  कारवाई करण्याची मागणी केली.

Web Title: 'That' bhondubabala police cellar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा