‘बीएचआर’च्या संचालिका ‘सीआयडी’च्या जाळय़ात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:53 AM2017-08-21T01:53:00+5:302017-08-21T01:53:27+5:30

अकोला : शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेच्या अकोला शाखेतील तब्ब्ल चार कोटी रुपयांच्या ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अकोला येथील पथकाने शनिवारी या पतसंस्थेच्या संचालिकेस ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी सीआयडीने या संचालिकेची कसून चौकशी सुरू केली आहे. ललिता सोनोने असे या संचालिकेचे नाव आहे.

BHR director's 'CID' burns! |  ‘बीएचआर’च्या संचालिका ‘सीआयडी’च्या जाळय़ात!

 ‘बीएचआर’च्या संचालिका ‘सीआयडी’च्या जाळय़ात!

Next
ठळक मुद्दे‘बीएचआर’ घोटाळा प्रकरणअकोल्यात झाली चौकशीराज्यभरातील शाखांमध्ये घोळ

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेच्या अकोला शाखेतील तब्ब्ल चार कोटी रुपयांच्या ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अकोला येथील पथकाने शनिवारी या पतसंस्थेच्या संचालिकेस ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी सीआयडीने या संचालिकेची कसून चौकशी सुरू केली आहे. ललिता सोनोने असे या संचालिकेचे नाव आहे.
अकोला शहरासह जिल्हय़ातील शेकडो ठेवीदारांची भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेच्या अकोला शाखेत ३ कोटी ९७ लाख ६४ हजार ९४९ रुपयांनी फसवणूक करण्यात आली होती. शेकडो ठेवीदारांनी या पतसंस्थेच्या विविध आकर्षक योजनांवर विश्‍वास ठेवत तब्बल चार कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. मात्र, त्यानंतर या ठेवींचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिक रक्कम मिळणार असल्याने ठेवीदारांनी पैसे परत घेण्यासाठी पतसंस्थेत मागणी सुरू केली; परंतु पतसंस्थेने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अकोल्यातील शेकडो ठेवीदारांची भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेच्या अकोला शाखेत ३ कोटी ९७ लाख ६४ हजार ९४९ रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले. पैसे परत मिळत नसल्याने काही ठेवीदारांनी बँकेच्या संचालक मंडळाविरुद्ध पोलिसात धाव घेतली. गजानन धामांडे यांच्या तक्रारीवरून या गैरव्यवहारात जबाबदार असलेल्या ३४ संचालकांविरुद्ध २३ फेब्रुवारी २0१६ रोजी सिटी कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४0९, ४२0, १२0 ब आणि एमपीएआयडी १९९९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस प्रकरणाचा तपास करीत असतानाच या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अकोला येथील पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर बीएचआरच्या संचालिका ललिता सोनोने यांना शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आले आहे. या  गैरव्यवहार प्रकरणात सदर संचालिकेची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सीआयडीच्या अधिकार्‍यांनी दिली.

राज्यभरातील शाखांमध्ये घोळ
बीएचआर पतसंस्थेच्या राज्यभरातील शाखांमध्ये ठेवीदारांच्या ठेवी परत न देता, यामध्ये मोठा गैरव्यवहार संस्थेच्या ३४ संचालकांनी केला आहे. हा घोळ अकोल्यातील शाखेसह राज्यभरातील शाखांमध्ये करण्यात आला असून, कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बुडविण्यात आल्या आहेत. यामध्ये काही संचालकांना यापूर्वीच अटक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, सोनोने यांना शनिवारी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: BHR director's 'CID' burns!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.