शेत माउली शेतकरी उत्पादक कंपनीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:51+5:302021-06-11T04:13:51+5:30
रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर वाढला असून, याचे दुष्परिणाम अन्नधान्य उत्पादनातून मानवाच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही दिसून येत आहेत; परंतु ...
रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर वाढला असून, याचे दुष्परिणाम अन्नधान्य उत्पादनातून मानवाच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावरही दिसून येत आहेत; परंतु निरोगी व उत्तम आरोग्य लाभण्यासाठी उत्तम आहार लागतो. याकरिता पातूर तालुक्यातील शेतकरी गटांनी ‘जैविक शेती’चा पर्याय निवडला आहे. महाराष्ट्र शासनाने जैविक शेतीला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना केली आहे. तालुक्यातील शेतकरी गटांनी जैविक पद्धतीने पिकविलेल्या उत्पादनांचे क्लिनिंग, ग्रेडिंग विक्री व संकलन करण्यासाठी रविवारी शेत माउली शेतकरी जैविक शेती मिशन उत्पादक कंपनीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व सर्ग विकास समिती अकोला अंतर्गत ‘महासंघ ऑरगॅनिक मिशन’ या नावाने महासंघ स्थापन झाला असून, महासंघातील ३७ शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी शेत माउली शेतकरी उत्पादक कंपनी आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जैविक महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पोहरे होते. उद्घाटक म्हणून प्रकल्प संचालक आरीफ शहा होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी कृषी अधिकारी कुवरसिंग मोहने तहसीलदार दीपक बाजड, तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे, जैविक मिशनचे आशिष मुधोडकर आदी होते. कार्यक्रमाला कंपनीचे अध्यक्ष सचिन ढोणे, सचिव विनोद क्षीरसागर, संचालक मंडळाचे प्रभुदास बोंबटकार, प्रल्हाद खोकले, अरुण अत्तरकार, विश्वनाथ सावंत, दिनेश पजई, सचिन फेंड, अरविंद चव्हाण, हरीश टप्पे, माधुरी ढोणे, तज्ज्ञ प्रशिक्षक धीरज धोत्रे आदी उपस्थित होते.
फोटाे:
===Photopath===
100621\img-20210606-wa0606.jpg
===Caption===
शेतमाऊली शेतकरी उत्पादक कंपनी