भुसावळ-वर्धा पॅसेंजर ‘मेमू’मध्ये रूपांतरित होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:54 PM2020-08-25T12:54:09+5:302020-08-25T12:54:36+5:30

भुसावळ ते वर्धा व वर्धा ते भुसावळ या पॅसेंजर गाड्या ‘मेमू’मध्ये रूपांतरित करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी सोमवारी आॅनलाइन पत्रकार परिषदेत दिली.

Bhusawal-Wardha passenger to be converted into 'MEMU'! | भुसावळ-वर्धा पॅसेंजर ‘मेमू’मध्ये रूपांतरित होणार!

भुसावळ-वर्धा पॅसेंजर ‘मेमू’मध्ये रूपांतरित होणार!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा बंद असली तरी, केंद्राकडून प्रवासी गाड्या सुरू करण्यास ‘ग्रीन सिग्नल’ मिळेल, तेव्हा भुसावळ ते वर्धा व वर्धा ते भुसावळ या पॅसेंजर गाड्या ‘मेमू’मध्ये रूपांतरित करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी सोमवारी आॅनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव, वरिष्ठ मंडळ सिंग्नल अभियंता निशांत द्विवेदी, उपमुख्य अभियंता (निर्माण) रोहित थावरे तर मुंबई येथून मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार उपस्थित होते.
कोरोना संकट काळात मध्य रेल्वेने अडगळीत पडलेल्या रेल्वे डब्यांमध्ये कमीत-कमी खर्च करून ८८२ आयसोलेशन कोच तयार केले असून, यापैकी ३० आयसोलेशन कोच भुसावळ मंडळात आहेत. सुदैवाने भुसावळ मंडळातील कोणत्याही स्थानकांवर या कोचेसची गरज पडली नाही.
गरज भासल्यास मंडळाअंतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानकांवर आयसोलेशन कोचेस पाठविण्यात येतील, असेही विवेक कुमार यांनी सांगितले. अकोला शहरातील रेल्वे मालधक्का बंद झाल्यानंतर तो बोरगाव मंजू येथे हलविण्यात आला आहे. या ठिकाणी आणखी सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


मागणी झाल्यास किसान ट्रेनची संख्या वाढवणार
भुसावळ मंडळात आठवड्यातून दोन दिवस किसान विशेष रेल्वे चालविली जात आहे. मागणी वाढल्यास या विशेष रेल्वेची संख्या वाढविण्यात येईल. मागणी झाल्यास अकोला येथील शेतकऱ्यांनाही किसान विशेष रेल्वेचा लाभ देता येईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.

Web Title: Bhusawal-Wardha passenger to be converted into 'MEMU'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.