भुसावळ-वर्धा पॅसेंजर १५ नोव्हेंबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

By Atul.jaiswal | Published: August 14, 2022 11:54 AM2022-08-14T11:54:32+5:302022-08-14T11:58:00+5:30

Bhusawal-Wardha passenger : ही गाडी दररोज सायंकाळी ५.३० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

Bhusawal-Wardha passenger service again from November 15 | भुसावळ-वर्धा पॅसेंजर १५ नोव्हेंबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

भुसावळ-वर्धा पॅसेंजर १५ नोव्हेंबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वसामान्य प्रवाशांना दिलासा एक्स्प्रेस गाड्यांमधील गर्दी कमी होणार

अकोला : पहिल्या लॉकडाऊन काळात बंद झालेली भुसावळ-वर्धा-भुसावळ ही पॅसेंजर गाडी पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सामान्य प्रवाशांची लेकुरवाळी अशी ओळख असलेली ही गाडी १५ नोव्हेंबर २०२२ पासून धावणार असून, अकोल्यासह इतर छोट्या स्थानकांवर या गाडीला थांबा राहणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय एक्स्प्रेस गाड्यांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. १११२१ भुसावळ-वर्धा पॅसेंजर ही १५ नोव्हेंबर २०२२ पासून भुसावळ स्थानकावरून दररोजी दुपारी २.३० वाजता रवाना होऊन रात्री ९ वाजता वर्धा स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी दररोज सायंकाळी ५.३० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. १११२२ वर्धा-भुसावळ पॅसेंजर ही गाडी १६ नोव्हेंबर २०२२ पासून वर्धा स्थानकावरून दररोज रात्री १२.०५ वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता भुसावळ स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी दररोज पहाटे ४.०० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. या गाडीला दहा जनरल व दोन एसएलआर असे एकूण १२ डबे असणार आहेत.

जिल्ह्यात या स्थानकांवर थांबा

अप व डाऊन दोन्ही बाजूच्या पॅसेंजर गाड्या अकोला व मूर्तिजापूर या मोठ्या रेल्वे स्थानकांसोबतच जिल्ह्यातील गायगाव, पारस, बोरगाव, काटेपूर्णा, मूर्तिजापूर, माना, कुरुम या लहान स्थानकांवरही थांबणार आहेत. अकोला स्थानकावर पाच मिनिटे, मूर्तिजापूर स्थानकावर दोन मिनिटे, तर इतर स्थानकांवर एक मिनीटचा थांबा असणार आहे.

 

भुसावळ-नागपूर कधी सुरू होणार?

कोरोना काळापूर्वी मध्य रेल्वेच्या अकोला स्थानकावरून भुसावळ-वर्धा, भुसावळ-नागपूर व भुसावळ-नरखेड या तीन पॅसेंजर गाड्या धावत होत्या. कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशव्यापी लाॅकडाऊन लागू केल्यामुळे रेल्वेची चाके ठप्प झाली होती. हळूहळू रेल्वेची प्रवासी वाहतूक पूर्ववत झाली, परंतु पॅसेंजर गाड्या बंदच राहिल्या. जनरेट्यामुळे गतवर्षी भुसावळ-नरखेड ही डेमू गाडी सुरू करण्यात आली. आता भुसावळ-वर्धा ही पॅसेंजरही सुरू होत आहे. त्यामुळे भुसावळ-नागपूर ही पॅसेंजर गाडी कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Bhusawal-Wardha passenger service again from November 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.