अतिक्रमकांसह प्रवासी वाहनांवर मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 06:36 PM2018-10-14T18:36:16+5:302018-10-14T18:39:12+5:30
अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशन तसेच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी अशोक वाटिका चौक ते सिंधी कॅम्पपर्यंत रस्त्यावर लावण्यात येत असलेल्या वाहनांवर कारवाई केली.
अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशन तसेच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी अशोक वाटिका चौक ते सिंधी कॅम्पपर्यंत रस्त्यावर लावण्यात येत असलेल्या वाहनांवर कारवाई केली. यावेळी एका वाहनातून तब्बल २ लाख ५० हजार रुपयांचे गुरांचे कत्तल केलेले मांस जप्त करण्यात आले आहे.
शहर वाहतूक नियंत्रण शाखा व सिटी कोतवाली पोलिसांनी अशोक वाटिका चौक ते सिंधी कॅम्प रस्त्यावर एक विशेष मोहीम राबविली. यावेळी रस्त्यावरील पानटपºया व अवैध वाहतूक करणाºया आठ वाहनाचालकांविरुध्द सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोला ते पातूर रोडवर प्रवासी वाहतूक करणारे एमएच ३० ई ९३०५ क्रमांकाच्या वाहनातून अडीच लाख रुपयांचे गुरांची कत्तल केलेले मांस जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांनी पातूर येथील तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून २५० किलो गुरांच्या २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील व कर्मचाºयांनी केली.