सोयाबीन चोरणारी मोठी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:16 AM2020-03-24T11:16:44+5:302020-03-24T11:16:55+5:30
९० हजार रुपयांचे सोयाबीने चोरल्याचे जवळपास मान्य केले आहे.
अकोला : बार्शीटाकळी रोडवरील एका शेतामधून ९० हजारांचे सोयाबीन चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या एका टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या टोळीमध्ये चार जणांचा समावेश असून, यामधील दोन चोरटे बाप-लेक असल्याचे समोर आले आहे. या चोरट्यांना मंगळवारी किंवा बुधवारी न्यायालयसमोर हजर करण्यात येणार आहे.
बार्शीटाकळी रोडवरील सतीश भाऊराव आखरे यांच्या शेतातील सोयाबीन आॅक्टोबर २०१९ मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केले होते. या प्रकरणी आखरे यांनी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व त्यांच्या पथकाने या टोळीवर पाळत ठेवून नायगाव येथील रहिवासी शेख रफीक शेख बशीर त्याचा मुलगा शेख फारुख, शेख जफर शेख हुसेन आणि शेख निसार शेख नजीर या चार आरोपींना अटक केली. चारही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून, त्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक अशाच प्रकारे चोरी केल्याची माहिती समोर येत आहे; मात्र या चार चोरट्यांनी आखरे यांचे सुमारे ९० हजार रुपयांचे सोयाबीने चोरल्याचे जवळपास मान्य केले आहे. त्यामुळे या टोळीकडून शेतकºयांचे पीक चोरी केल्याच्या आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.