पुलावरून दुचाकी खाली कोसळली : एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 17:24 IST2019-05-03T17:23:15+5:302019-05-03T17:24:15+5:30
हातरुण : भरधाव दुचाकी पुलावरून खाली कोसळल्याने एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना २ मे रोजी रात्री ११ वाजता घडली.

पुलावरून दुचाकी खाली कोसळली : एक ठार
हातरुण : भरधाव दुचाकी पुलावरून खाली कोसळल्याने एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना २ मे रोजी रात्री ११ वाजता घडली. नागेश सावंग (४२) असे मृतकाचे नाव आहे.
नागेश सावंग व बिजु सावंग हे दुचाकीने हातरुण ते बोरगाव वैराळे रस्त्यावरून जात होते. दरम्यान, कोळशाच्या नाल्याजवळ त्यांची दुचाकी पुलावरून खाली कोसळली. यामध्ये नागेश सावंग हे जागीच ठार झाले तर बिजु सावंग गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. तसेच गंभीर जखमीला सर्वोपचार रुग्णालयात हलवले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार उरळ सतिष पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस नायक विजय चव्हाण करीत आहेत.