बाईकस्वारांची ‘धूम’ या स्टंटबाजांना आवरणार काेण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 10:46 AM2021-08-04T10:46:13+5:302021-08-04T10:46:32+5:30
Akola News : पाेलिसांनीच कठाेर फाैजदारी कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़.
- सचिन राऊत
अकाेला : शहरातील विविध रस्त्यांवर पहाटेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत कडक ड्यूटी देणारे वाहतूक पाेलीस घराकडे परतताच स्टंटबाज दुचाकीचालक रस्त्यांवर चंगळ करीत असल्याचे वास्तव आहे़. या स्टंटबाजांना आवरणे कठीण झाले असले तरी वाहतूक शाखेने गत सात महिन्यांच्या कालावधीत तब्ब्लल पाच हजार १४ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून लाखाे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़. अकाेल्यातील गाैरक्षण राेड सध्या धूम स्टाईल बाइक चालविण्यासाठी चांगलाच चर्चेत आला आहे़. या राेडवर दुचाकीसह चारचाकी चालकही अतिवेगात वाहने चालवत असल्याने इतरांच्या जिवाला धाेका निर्माण झाला आहे़. गत काही दिवसांपूर्वी याच मार्गावर चारचाकी वाहनात दाेन जणांचा मृत्यू झाला हाेता़. तर दाेन जण जखमी झाले हाेते़. अनेक दुचाकी चालकांचाही अशाच प्रकारे या राेडवर मृत्यू झाला आहे़. त्यामुळे धूम स्टाईल दुचाकी चालविणाऱ्यांवर आता पाेलिसांनीच कठाेर फाैजदारी कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़.
स्टंटबाजांवरील कारवाई
वर्ष ओव्हर स्पीड ट्रीपल सीट
२०१९ २३१ ९२०
२०२० ४०७२ ७८७
२०२१ जुलैपर्यंत २५८० २४३४
दंड भरायचा अन् सुटका करून घ्यायची
स्टंटबाज तसेच अतिवेगाने दुचाकी चालविणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येते; मात्र या कारवाईला स्टंटबाज काहीच जुमानत नसल्याचे वास्तव आहे़. २०० ते ५०० रुपयांचा दंड जागेवरच भरुन हे स्टंटबाज पुन्हा स्टंट करायला माेकळे हाेत असल्याचे वास्तव आहे़ अकाेल्यात मात्र वाहतूक शाखेने फटाके फाेडणारे दुचाकी चालक व स्टंटबाजांवर कारवाइ केली. परंतु काही बड्यांच्या मुलांनी पाेलिसांच्या कारवाईलाच आव्हान दिल्याचे वास्तव आहे़. पाेलिसांनी फटाके फाेडणाऱ्या दुचाकींवर त्यांचे सायलेन्सर नष्ट करण्याची अनाेखी कारवाई केल्याने त्यांचे राज्यस्तरावर काैतुकही करण्यात आले़.
रात्री उशिरा या ठिकाणी हाेते स्टंटबाजी
वाहतूक पाेलीस रस्त्यांवरून कमी हाेताच शहरातील गाैरक्षण राेड, रिंग राेड, नेकलेस राेड, बारा ज्याेतिर्लिंग राेड तसेच शहराबाहेरील सिमेंट राेडवर स्टंटबाज वेगवेगळे स्टंट करीत असल्याचे वास्तव आहे. तर काही स्टंटबाज डाॅ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील राेडवरही स्टंटबाजी करीत असल्याची माहिती आहे़. यांना घरून माेकळीक असली तरी पाेलिसांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे़.
तर जिवावर बेतू शकते
शहरातील विविध रस्त्यांवर स्टंटबाजी करणाऱ्यांचा हैदाेस प्रचंड वाढलेला असतानाच हा प्रकार त्यांच्या जिवावर बेतू शकतो. पाेलिसांकडून या स्टंटबाजांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे; मात्र या स्टंटबाजांवर कुटुंबातून काहीही दबाव नसल्याने ते आणखीनच वेगात दुचाकी चालवीत असल्याचे वास्तव आहे़ हा प्रकार स्टंटबाजांच्या जिवावर बेतू शकतो.
धूम स्टाईल दुचाकी चालविणारे तरुण स्वत:साेबत इतरांचाही जीव धाेक्यात घालतात़ यांना पाेलिसांकडून आवर घालण्यात येते; मात्र श्रीमंतांची मुले असल्याने त्यांच्यासाठी राजकीय पदाधिकारी पाेलिसांवर दबाव टाकतात़. हा प्रकार समाजासाठी घातक असल्याने अशा मुलांवर कुटुंबीयांनीच चांगले संस्कार करण्याची गरज आहे़.
- गजानन शेळके, प्रमुख वाहतूक शाखा अकाेला