तुरीचे चुकारे प्रलंबित; शेतकरी अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:54 PM2019-05-08T12:54:13+5:302019-05-08T12:54:21+5:30
अकोला: नाफेडमार्फत तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार केंद्रांवर ४ मेपर्यंत ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र तूर विकल्यानंतर १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नाही.
अकोला: नाफेडमार्फत तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील चार केंद्रांवर ४ मेपर्यंत ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र तूर विकल्यानंतर १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नाही. विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळाले नसल्याने, दुष्काळी परिस्थितीत तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी दराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील बाळापूर, पारस, पातूर व तेल्हारा या चार खरेदी केद्रांवर ४ मेपर्यंत ३ हजार २०८ शेतकºयांची ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. एकूण २७ कोटी ६६ लाख ६१ हजार ९२५ रुपयांची तूर खरेदी करण्यात आली असली तरी, त्यापैकी १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ शेतकºयांना अद्याप तुरीचे चुकारे मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत आधीच शेतकरी संकटात सापडले असताना, विकलेल्या तुरीचे हक्काचे पैसे मिळाले नसल्याने, तूर उत्पादक शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानुषंगाने तुरीचे चुकारे केव्हा मिळणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
तूर खरेदीचे असे आहे वास्तव!
नाफेडमार्फत तूर खरेदीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयांतर्गत बाळापूर, पारस, पातूर व तेल्हारा या चार खरेदी केंद्रांवर ३ हजार २०८ शेतकºयांची ४८ हजार ७५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या तुरीच्या एकूण २७ कोटी ६६ लाख ६१ हजार ९२५ रुपये रकमेपैकी ११ कोटी ७५ लाख ८३ हजार १६२ रुपयांचे चुकारे वितरित करण्यात आले. १ हजार ८७० शेतकºयांना १५ कोटी ९० लाख ७८ हजार ७६३ रुपयांचे चुकारे अद्याप मिळाले नसल्याचे वास्तव आहे.