वीज यंत्रणेवर फलके,पोस्टर्स; महावितरण करणार फौजदारी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 07:11 PM2020-12-09T19:11:31+5:302020-12-09T19:16:15+5:30

MSEDCL News अनाधिकृत फलके,पोस्टर्स,बॅनर्स व होर्डींगमुळे सुरळीत वीज पुरवठ्याला अडथळा ठरत आहे.

Billboards, posters on electrical systems; MSEDCL will file a criminal complaint | वीज यंत्रणेवर फलके,पोस्टर्स; महावितरण करणार फौजदारी तक्रार

वीज यंत्रणेवर फलके,पोस्टर्स; महावितरण करणार फौजदारी तक्रार

Next
ठळक मुद्देसंबंधितांना बजावल्या नोटीस. प्रचार, प्रसिद्धीसाठी होतोय वापर.

अकोला :शहरात वीज खांब, रोहित्रे,फिडर पीलर ,डी.पी.इत्यादी महावितरणच्या यंत्रणेवर किंवा यंत्रणेच्या अगदी जवळ/खाली अनेक संस्था ,व्यावसायीक,जाहिरातदारांनी आपल्या प्रचार प्रसिध्दीसाठी लावण्यात आलेली अनाधिकृत फलके,पोस्टर्स,बॅनर्स व होर्डींगमुळे सुरळीत वीज पुरवठ्याला अडथळा ठरत आहे. त्यामुळे महावितरणच्या अत्यावशक सेवेला बाधा ठरणाऱ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितावर फौजदारी दाखल करण्याची प्रक्रिया महावितरण जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. फौजदारीची पहिली प्रक्रिया म्हणून संबंधिताना महावितरणकडून नोटीसाही बजावण्यात आल्या आहे.

विजेसारखी अत्यावशक सेवा देण्यासाठी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात महावितरणचे विद्युत जाळे निर्माण करण्यात आले आहे.मात्र अनेक व्यावसायीक,संस्था जाहिरातदारांनी महावितरणच्या खांबाचा,डि.पी,वितरण पेटीचा वापर बॅनर्स,पोस्टर्स,फलके,होर्डींग लाऊन आपल्या प्रचार प्रसिध्दीसाठी केला आहे.परंतू या प्रचार,प्रसिध्दी साहित्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट होणे, वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे,शिवाय याचा सर्वात मोठा अडथळा हा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीज जाळ्यांची देखभाल दुरूस्ती करताना होत आहे. काही ठिकाणी यामुळे अपघात झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.

शहराचे विदृपीकरण

अवैधरित्या लावलेली फलके,पोस्टर्स,बॅनर्स,होर्डींगामुळे महावितरणच्या ग्राहकसेवेवर तर परिणाम होतच आहे.याशिवाय यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात विदृपीकरणही होत आहे. .

शासनाच्या मालमत्तेचा वापर कायद्याने गुन्हा

महावितरणच्या म्हणजेच पर्यायाने महाराष्ट्र शासनाच्या मालमत्तेचा वापर अवैधरित्या आपल्या प्रचार प्रसिध्दीसाठी करणे हा कायद्याने गुन्हा आहे.त्यामुळे महावितरणची नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसात त्यावर कारवाई केल्याचे महावितरणला संबंधित संस्था,व्यावसायीक किंवा जाहिरातदारांनी लेखी कळवावे,अन्यथा विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मालमत्तेच्या विदृपणास प्रतिबंध करण्याकरिता असलेले अधिनियम १९९५ अंतर्गत संबंधितावर फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.

Web Title: Billboards, posters on electrical systems; MSEDCL will file a criminal complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.