जिल्हा सामान्य रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा अस्ताव्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:24 PM2018-12-16T17:24:20+5:302018-12-16T17:24:30+5:30

वाशिम : ‘बायोमेडिकल वेस्ट’ अर्थात जैववैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन हुकले असून, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात जैववैद्यकीय कचरा कुठेही अस्ताव्यस्त फेकून दिला जात आहे.

Bio medical waste in district general hospital | जिल्हा सामान्य रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा अस्ताव्यस्त

जिल्हा सामान्य रुग्णालयात जैव वैद्यकीय कचरा अस्ताव्यस्त

googlenewsNext

‘बायोमेडिकल वेस्ट’च्या नियोजनाचा ‘कचरा’ !
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘बायोमेडिकल वेस्ट’ अर्थात जैववैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन हुकले असून, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात जैववैद्यकीय कचरा कुठेही अस्ताव्यस्त फेकून दिला जात आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देऊन रुग्णालयांतर्गतची नियमित साफसफाई, स्वच्छता होईल, याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात अकोला नाकास्थित २०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. अगोदरच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची रिक्त पदे असल्याने नानाविध समस्यांना सामोरे जावे लागणाºया जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला जैववैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावण्याचे यशस्वी नियोजन अद्याप जमले नाही. रुग्णांच्या उपचारादरम्यान वापरलेले हँडग्लोव्हज, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, दुषित सुया, सर्जिकल ब्लेड आदी स्वरूपातील ‘बायोमेडिकल वेस्ट’ची योग्य विल्हेवाट लावण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना आहे. तथापि, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात ‘बायोमेडिकल वेस्ट’ कुठेही फेकून दिले जात असल्याने दुर्गंधी परसण्याबरोबरच प्रशासनाचे दिरंगाई धोरणही समोर येत आहे. जैववैद्यकीय कचºयाप्रमाणेच रुग्ण भरती केले जाणारे वॉर्ड, मुत्रीघरे, शौचालयांमध्ये अस्वच्छता पसरल्याचे दिसून येते. रुग्णालयाच्या बाह्य परिसरातही सर्वत्र कचºयाचे ढीगार साचत आहेत. 


जैववैद्यकीय कचरा उचलून नेण्याचे कंत्राट देण्यात आले आहेत. संबंधित कंत्राटदाराचे देयक थकित होते. आता निधी प्राप्त झाला असून, आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच संबंधित कंत्राटदाराचे देयक अदा केले जाईल. जैववैद्यकीय कचरा नियमित उचलून नेण्याचा सूचना संबंधित कंत्राटदाराला दिल्या जातील.
- ए.व्ही. सोनटक्के
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

Web Title: Bio medical waste in district general hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.