जैविक घटक ट्रायकोग्रामाचे उत्पादन वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:47 PM2018-04-23T13:47:41+5:302018-04-23T13:47:41+5:30
- राजरत्न सिरसाट
अकोला : पर्यावरण प्रदूषण कमी करण्याकरिता, विषारी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करू न शेतकऱ्यांना ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्यावतीने जैविक कीड नियंत्रण घटक उत्पादन वाढीवर भर दिला असून, या घटकाच्या उत्पादनासाठी मागील चार वर्षांत विदर्भातील ९०० शेतकऱ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात आले.
खरीप, रब्बी पिकांवर अनेक नवीन किडींचा प्रादुर्भाव अलीकडे वाढला असून, यातील घाटेअळी विषाणू, ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटक व क्रायसोपा व ढाल या परभक्षी जैविक घटकांचे उत्पादन व हे जैविक कीड नियंत्रक वापरण्यासंबंधी विदर्भातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. २०१४-१५ पासून या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत ३७ च्यावर शेतकरी गटांना प्रशिक्षण देण्यात आले.
विदर्भातील तूर, कापूस, हरभरा, सोयाबीन व भाजीपाला पिकांवरील किडींचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने घाटेअळी विषाणू, ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटक तसेच क्रायसोपा या परभक्ष्यी कीटकांची प्रयोगशाळेत निर्मिती व त्यांचा पिकामध्ये वापर व इतर इत्थंभूत माहिती प्रत्यक्ष उत्पादन तंत्राच्या अनुभवातून शेतकºयांना या प्रशिक्षणात देण्यात आली. किडींची अंडी व सुरुवातीच्या अळी अवस्थेतच किडींचा समूळ नायनाट करण्याकरिता व दीर्घकाळ प्रभावी अशा जैविक घटकांच्या माध्यमातून कीड व्यवस्थापन करणे अत्यंत सोपे, सरळ व कमी खर्चाचे असल्याचे शेतकºयांना या प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगण्यात आले. यासाठी विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा आत्मा संस्थेच्या सहयोगाने हे मोफत प्रशिक्षण डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठात देण्यात आले.
- स्वयंरोजगार होणार उपलब्ध!
जैविक घटकांचे उत्पादन हे जैविक कीड नियंत्रण करण्यासाठी असून, स्वयंरोजगारासाठी हे उत्तम साधन आहे. या जैविक घटकांचे उत्पादन करू न बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या उत्पन्न प्राप्त करू शकतात. याचे उत्पादन करणे सोपे असून, घरी, गाव स्तरावरसुद्धा उत्पादन घेता येते.
- रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करू न जैविक घटकांचा शेतात वापर करू न भरघोस उत्पादन घेण्यासाठी विदर्भात ३७ प्रशिक्षण घेण्यात आले असून, ९०० शेतकºयांना प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षित शेतकºयांनी याचा लाभ घेण्याची गरज आहे.
- डॉ. धनराज उंदिरवाडे, विभाग प्रमुख,
कीटकशास्त्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.