‘मास्क’च्या विल्हेवाटीसाठी ‘बायोमेडिकल वेस्ट’ नियम लागू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:09 AM2020-03-27T11:09:05+5:302020-03-27T11:09:14+5:30

बायोमेडिकल कचरा महापालिकेने नियुक्त केलेल्या संकलनकर्त्यांकडेच द्यावा, असेही बजावण्यात आले.

'Biomedical Waste' rules apply for 'mask' disposal! | ‘मास्क’च्या विल्हेवाटीसाठी ‘बायोमेडिकल वेस्ट’ नियम लागू!

‘मास्क’च्या विल्हेवाटीसाठी ‘बायोमेडिकल वेस्ट’ नियम लागू!

googlenewsNext

अकोला: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या ‘मास्क’ची विल्हेवाटही बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटच्या नियमानुसार करण्याचे बंधनकारक आहे. तसेच कोरोनासंदर्भात घरीच विलगीकरण केलेले (होम क्वारंटीन) नागरिकांनी वापर केलेला बायोमेडिकल वेस्ट कचरा घंटागाड्यांमध्ये न टाकता बायोमेडिकल वेस्ट गोळा करणाºया वाहन, संस्थांकडून मोफतपणे गोळा करण्याचेही निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘महाराष्ट्र कोविड-१९ मापदंड, अधिनियम २०२०’नुसार दिले आहेत.
या अधिनियमानुसार ज्या रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित किंवा बाधितांवर उपचार सुरू नाहीत, त्यांच्याकडे वापर करून गोळा होणारे मास्क, अ‍ॅप्रन, जोड्यांची आच्छादनेही बायोहझार्डस सिम्बॉल असलेल्या पिशव्यांमध्येच गोळा करावे लागणार आहेत. हा बायोमेडिकल कचरा महापालिकेने नियुक्त केलेल्या संकलनकर्त्यांकडेच द्यावा, असेही बजावण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभागाने घरीच राहण्यासाठी विलगीकरण केलेल्या ‘होम क्वारंटीन’ नागरिकांनी त्यांच्या वापरातून निर्माण होणाºया ‘बायोमेडिकल वेस्ट’बाबत आरोग्य विभागाचे सेवा केंद्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य केंद्रात माहिती देणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडे असलेल्या केअरटेकर यांनी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट सुविधा देणाऱ्यांकडे ‘यलो बॅग’ची मागणी करावी, त्या बॅगमध्ये ‘होम क्वांरटीन’ नागरिकाकडून वापरलेला जैववैद्यकीय कचरा गोळा करावा, त्यासाठी नाममात्र शुल्क घेता येऊ शकते. संबंधित संस्था किंवा आरोग्य सेवा केंद्रातून ही बॅग मिळू शकते; मात्र जैववैद्यकीय कचरा गोळा करण्याची सेवा मोफत दिली जाणार आहे. ‘होम क्वारंटीन’ नागरिकांनी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियमानुसारच कचºयाची विल्हेवाट लावावी, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी-कर्मचाºयांना दक्ष राहावे लागणार आहे.
 

 

Web Title: 'Biomedical Waste' rules apply for 'mask' disposal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.