पैदास व्यवस्थापनात जैव तंत्रज्ञान गरजेचे - डॉ. एम. एस. चौहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:47+5:302021-02-09T04:20:47+5:30
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला यांच्या वतीने दि. २ ते ६ ...
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला यांच्या वतीने दि. २ ते ६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान आयोजित ‘दुधाळ पशूंमध्ये प्रजनन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी अत्याधुनिक जैव तंत्रज्ञान’ या संकल्पनेवर आधारित पाचदिवसीय आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दूध उत्पादनवाढीसाठी व शाश्वत दूध व्यवसायासाठी कालवडीचा वयात येण्याचा कालावधी तसेच दोन वितातील अंतर कमी करण्याबरोबर जनावर विण्याच्या सुमारास उत्तम आरोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी अधोरेखित केले. प्रशिक्षण समारोपप्रसंगी प्रा. डॉ. माणिक तांदळे, अधिष्ठाता, कर्नाटक पशुवैद्यकीय विद्यापीठ, बिदर व प्रा. डॉ. नितीन कुरकुरे, संशोधन संचालक, माफसू नागपूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रशिक्षण समन्वयक डॉ. महेश इंगवले यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. तर प्रा. डॉ. चैतन्य पावशे यांनी मान्यवरांसह प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विविध राज्यांतील एकूण २४० विद्यार्थी, पशुवैद्यकीय अधिकारी, संशोधक आदींचे स्वागत केले.
सदर प्रशिक्षणात प्रा डॉ. मो.अमीन बेग (सौदी अरेबिया), डॉ. संजीव चौबळ (अमेरिका), डॉ पांडुरंग नेटके (ऑस्ट्रेलिया), डॉ. कुमरेसन (बंगळुरू), डॉ. होनपारखे (पंजाब), डॉ. सुनील जाधव (बरेली), डॉ. बी.एन.सुतार (गुजरात), डॉ. एस. संतोष कुमार, डॉ सेल्वराजू (तामिळनाडू), डॉ. मुरुगवेल (पाँडिचेरी), डॉ. टी.के. मोहंती ( हरयाणा), डॉ. प्रदीप महाजन आणि डॉ. जयंत खडसे (पुणे) आदी व्याख्यात्यांनी पशुप्रजनन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान यासंबंधी विविध विषयांवर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन डॉ. प्रवीण बनकर यांनी केले. आभार डॉ. श्याम देशमुख यांनी मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सुनील वाघमारे, डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी तर तांत्रिक सहकार्य नॉलेज पार्टनर असलेल्या आलेम्बिक फार्माचे पी. करुणानिथी, डॉ. संतोष शिंदे, डॉ. नरेश कुलकर्णी व चमूने परिश्रम घेतले.