काटेपूर्णा अभयारण्यात होणार पक्षी निरीक्षण
By admin | Published: October 3, 2016 02:23 AM2016-10-03T02:23:07+5:302016-10-03T02:23:07+5:30
वन्य जीव सप्ताहास उत्साहात प्रारंभ.
अकोला, दि. 0२-अकोला वन्यजीव विभाग, वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित वन्यजीव सप्ताहाचा उद्घाटन समारंभ शनिवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृहात उत्साहात पार पडला. या सप्ताहात काटेपूर्णा अभयारण्यात पक्षी निरीक्षण व श्रमदानातून वनराई बंधार्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष भडांगे तर प्रमुख अतिथी म्हणून वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रकाश लोणकर, ह्यसृष्टीवैभवह्णचे उदय वझे, प्रा. राजा सर, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र तेलकर, संदीप सरडे, सर्पमित्र बाळ काळणे, सामाजिक वनीकरण विभागाचे सहायक वनसंरक्षक सुनील जयस्वाल, वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गाडे व अकोला वनविभागाचे सहायक वनसंरक्षक नितीन गोंडाणे उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अध्यक्ष म्हणून बोलताना प्रा. सुभाष भडांगे यांनी वनविभागाच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांंंंना पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनाबाबत जागृत केले. यानंतर उपवनसंरक्षक प्रकाश लोणकर यांनी वन्यजीव सप्ताहाचे उद्दिष्ट खर्या अर्थाने पूर्ण करण्यासाठी वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सर्वांंंंनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विभागामार्फत वन्यप्राण्यांमुळे झालेल्या नुकसानापोटी वर्षभरात दोन कोटी नुकसानभरपाई अदा करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात येणार नाही, याकरिता सर्वांंंंनी पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सृष्टीवैभवचे उदय वझे यांनी केले. वृक्षारोपणाकरिता ह्यथ्रो सिड्सह्ण या संकल्पना राबविण्यासाठी त्यांनी वृक्ष बियांचे वाटप केले. यानंतर शिवाजी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक राजा सर यांनी ह्यवायुप्रदूषण तथा निसर्ग साखळीतील वन्यजीवांचे महत्त्वह्ण या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले. निसर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने वन्यजीव सप्ताहादरम्यान निसर्गप्रेमींना पक्ष्यांची घरटी वितरित केली जाणार आहेत. या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सर्पमित्र मुन्ना खान यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्या त आला. कार्यक्रमाचे संचालन गायत्री देशमुख हिने तर आभार अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. वायाळ यांनी मानले. दुपारच्या सत्रात कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयाचे प्राध्यापक ए. एम. गोरे यांनी पावरपॉइंटच्या माध्यमातून 'सर्पदंश व उपचार' व 'जैवविविधता' या विषयांवर मार्गदर्शन केले.