अकोला जिल्ह्यात तितर-बटेरची तस्करी करणारी टोळी सक्रिय;  पिंजरा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:26 PM2018-02-22T13:26:49+5:302018-02-22T13:28:48+5:30

अकोला : तितर-बटेर पक्षी पकडून त्याची तस्करी करणारी मोठी टोळी बाळापूर वन परिक्षेत्रात सक्रिय असल्याचा प्रकार उजेडात आला.

Birds trafficking in Akola district; Cage seized | अकोला जिल्ह्यात तितर-बटेरची तस्करी करणारी टोळी सक्रिय;  पिंजरा जप्त

अकोला जिल्ह्यात तितर-बटेरची तस्करी करणारी टोळी सक्रिय;  पिंजरा जप्त

Next
ठळक मुद्देनायलॉन दोऱ्याने  विणलेला पिंजरा वन परिक्षेत्रातून बुधवारी जप्त करण्यात आला. हा पिंजरा उचलून पाहिला असता, त्यात दोन पक्षी आढळून आलेत.बाळ काळणे यांनी अडकलेल्या दोन्ही पक्ष्यांच्या पायांना लागलेली गाठ काढून त्यांची सुटका केली. बाळ काळणे यांनी अडकलेल्या दोन्ही पक्ष्यांच्या पायांना लागलेली गाठ काढून त्यांची सुटका केली.



अकोला : तितर-बटेर पक्षी पकडून त्याची तस्करी करणारी मोठी टोळी बाळापूर वन परिक्षेत्रात सक्रिय असल्याचा प्रकार उजेडात आला. नायलॉन दोऱ्याने  विणलेला पिंजरा वन परिक्षेत्रातून बुधवारी जप्त करण्यात आला असून, अडकलेल्या दोन पक्ष्यांना जीवनदान देण्यात आले.
बाळापूर तालुक्यातील वन परिक्षेत्रात आरएफओ कातखेडे, राऊंड आॅफीसर गीते आणि मानद वन्य जीव रक्षक बाळ काळणे दोघे वन परिक्षेत्रात परीक्षणासाठी गेले असता, त्यांना एका झाडाखाली टोपलीच्या आकाराचा पिंजरा आढळून आला. हा पिंजरा उचलून पाहिला असता, त्यात दोन पक्षी आढळून आलेत. या दोन्ही पक्ष्यांचे पाय नायलॉनच्या दोºयात अडकलेले असल्याने त्यांना बाहेर निघता येत नव्हते. त्यामुळे बाळ काळणे यांनी अडकलेल्या दोन्ही पक्ष्यांच्या पायांना लागलेली गाठ काढून त्यांची सुटका केली. दरम्यान, शोध घेऊनही येथे कुणी आढळले नाहीत. या घटनेचा मागोवा घेतला असता, तितर-बटेर आणि इतर पक्षी पकडणारी मोठी टोळी या परिसरात सक्रिय असल्याची माहिती समोर आली.

*असा आहे नायलॉन पिंजरा....

टोपलीच्या आकारासारखा नायलॉनच्या बारीक दोºयाने विणलेला हा पिंजरा पक्षी बसत असलेल्या झाडाखाली ठेवला जातो. त्या पिंजरच्या खाली शिकार फसावे म्हणून तांदूळ आणि गव्हाचे दाणे टाकले जातात. पक्षी दाण्यांना पाहून आकर्षित होतात. दाणे वेचण्यासाठी पक्षी पिंजºयावर पाय ठेवताच त्यांचे पाय नायलॉनच्या दोºयात फसतात अन् पक्षी पिंजºयात अडकतो. सकाळी असे पिंजरे वनपरिक्षेत्रात ठेवून सायंकाळी ते उचलले जातात. परिसरातील मांसाहारी हॉटेलमध्ये हे पक्षी महागड्या किमतीत विकल्या जातात.

-वन परिक्षेत्रात आढळलेल्या पिंजºयाने परिसरात पक्ष्यांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या टोळीचा छळा लावण्याचे आव्हान वन विभाग आणि वन्य जीव विभागावर आहे. याची गंभीर दखल व्यक्तीश: घेण्यात आली आहे.
-बाळ काळणे, मानद वन्य जीव रक्षक, अकोला.
-----------------------
फोटो आवश्यक

 

Web Title: Birds trafficking in Akola district; Cage seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.